Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

संत गाडगे महाराज प्रश्न मंजुषा | गाडगेबाबा १० ओळी भाषण | Muttepawar sir

राष्ट्रसंत गाडगेबाबा  १० ओळी भाषण

संत गाडगे महाराज प्रश्न मंजुषा | गाडगेबाबा १० ओळी भाषण | Muttepawar sir

1) सर्वांना सप्रेम नमस्कार

2) आदरणीय मुख्याध्यापक , पूजनीय गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो,

3) माझे नाव -------- आहे.

4) संत गाडगेबाबा महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला.

5) त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते.

6) त्यांचे बालपण मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच गेले. 

7) लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता.

8) त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका,  जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.

9) राष्ट्रसंत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत.  'मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही' असे ते कायम म्हणत.

10) अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन "संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ" असे नामकरण करण्यात आलेले आहे.

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना आदरांजली !


विकिपीडिया 

 

प्रश्न मंजुषा 👇👇👇


1/10
राष्ट्रसंत गाडगे महाराजांचे नाव काय ?
डेबूजी
झिंगराजी
राणोजी
रामरावजी
2/10
राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला ?
नागपूर
अकोला
यवतमाळ
अमरावती
3/10
राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा जन्म केव्हा झाला ?
०४ मार्च १९२०
२३ जानेवारी १८७०
२३ फेब्रुवारी १८७६
१३ फेब्रुवारी १८९०
4/10
राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी दिनांक ........ रोजी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला.
१९ फेब्रुवारी १९१५
१ जानेवारी १९१२
२२ मार्च १९२०
१ फेब्रुवारी, १९०५
5/10
संत गाडगे महाराजांचे आवडते भजन कोणते होते?
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
हरे राम हरे कृष्ण
श्री राम, जय राम, जय-जय राम
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
6/10
'महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ', असे यथार्थ उद्गार ....... यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.
वि.वा. शिरवाडकर
आचार्य अत्रे
ना.सी. फडके
रणजित देसाई
7/10
राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज आपल्या कीर्तनातून कोणता संदेश देत असत?
जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका.
व्यसन करु नका
सावरकरांचे कर्ज काढून नका.
वरीलसर्व
8/10
कोणत्या विद्यापीठाला संत गाडगे बाबा यांचे नाव दिले आहे
अमरावती
नागपूर
कोल्हापूर
मुंबई
9/10
संत गाडगे महाराज यांचे ........ रोजी वळगावजवळील पेढी नदीच्या काठी निधन झाले.
20 डिसेंबर 1956
25 डिसेंबर 1956
20 जानेवारी 1960
05 मार्च 1948
10/10
संत गाडगेबाबा महाराज यांची समाधी कोठे आहे?
अमरावती
मुंबई
पंढरपूर
देहू
Result:

Post a Comment

0 Comments