लोकमान्य टिळक
नमस्ते विद्यार्थी मित्रांनो,
i) सर्वप्रथम आपण दहा ओळी मध्ये अत्यंत सोप्या भाषेमध्ये भाषण पाहणार आहोत
ii) लोकमान्य टिळक यांच्या संदर्भात सविस्तरपणे आपण माहिती (निबंध) पाहणार आहोत.
iii) दिलेल्या माहितीच्या आधारावर एक राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा आपण सोडवणार आहोत.
10 ओळी भाषण मराठी
1) सर्वांना सप्रेम नमस्कार.
2) आदरणीय मुख्याध्यापक,पूजनीय गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो,
3) माझे नाव
-------- आहे.
4) लोकमान्य
टिळकांचा जन्म 23 जुलै 1856
रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.
5) लोकमान्य टिळक हे छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत.
6) टिळकांनी इंग्रज शासनाविरुद्ध बंड पुकारले, त्यामुळे इंग्रजांनी त्यांना 6 वर्षासाठी कारावासाची शिक्षा सुनावली.
7) मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना लोकमान्य
टिळकांनी 'गीतारहस्य' हा
ग्रंथ लिहिला.
8) लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली.
9) लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी
टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केले.
10) भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे महान
व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक यांचे १ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले.
सविस्तर माहिती (निबंध )
"महान कार्य कधीही सोपे नसतात
आणि सहज होणारे कार्य महान नसतात"
बाळ गंगाधर टिळक भारतीय क्रांतीकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकिल व भारतीय स्वातंत्र्य सेनानी देखील होते. भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे पहिले नेता लोकमान्य टिळक !
लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचे जन्मनाव नाव केशव ठेवण्यात आले होते. पण सर्वजण त्यांना लाडाने ‘बाळ’ म्हणत. त्यामुळे मोठे झाल्यावर बाळ गंगाधर टिळक हेच नाव त्यांना पडले. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते.
टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते. गणित आणि संस्कृत हे त्यांचे आवडीचे विषय होते.
टिळकांना बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यांची बंडखोर वृत्ती आणि कणखर बाणा लहानपणापासूनच दिसत होता.
लहानपणापासूनच त्यांना उत्साही आणि उत्कट राष्ट्रवादी आणि क्रांतिकारी कार्यात भाग घेण्याची खूप आवड होती आणि म्हणूनच ते अशा राष्ट्रवादी लोकांना पाठिंबा देत असत.
वयाच्या १६ व्या वर्षी टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि १७ व्या वर्षी त्यांचे लग्न सत्यभामाबाई उर्फ तापीबाई यांच्यासोबत झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. १८७६ साली टिळक गणित विषयातून बी.ए ची परीक्षा उत्तीर्ण झाले. यावरच न थांबता पुढे त्यांनी एल.एल.बी देखील केले.
डेक्कन कॉलेज मध्ये असताना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. १८८० मध्ये त्यांनी विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेज चालू केले.
टिळकांनी लोकजागृतीसाठी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे चालू केली. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. लोकांनी एकत्र यावे आणि त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी, हा त्यामागील उद्देश्य होता. १८९६ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. टिळकांनी शेतकाऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले. त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले आणि केसरी वृत्तपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. १८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
भारतीय समाजाचा नाश करण्यासाठी इंग्रजांनी केलेले अत्याचार पाहिल्यानंतर टिळकांनी आपले जीवन भारत आणि भारतातील जनतेला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समर्पित केले होते.
टिळकांच्या सिंहगर्जनेने संपूर्ण इंग्रज सरकार हादरून जात असत. टिळकांनी संपूर्ण स्वराज्य घेण्याचा निर्धार केला होता. त्यांच्या नेतृत्वाच्या अनोख्या शैलीमुळे त्यांना जनमानसात लोकप्रिय केले, इंग्रजांमध्ये तर त्यांची भीतीच पसरली होती. त्यांना ब्रिटिश सरकारने भारतीय असंतोषाचे जनक म्हणून संबोधले.
ते एक दूरदर्शी नेते होते ज्यांनी माध्यमे आणि संप्रेषणाची क्षमता समजून घेतली आणि त्याचा उपयोग भारतातील ब्रिटीश राजवटीविरुद्ध समर्थन गोळा करण्यासाठी केला. टिळकांनी केसरी मध्ये अनेक अग्रलेख लिहिले. ‘या सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय?’, ‘उजाडले पण सूर्य कुठे आहे?’ अशा अग्रलेखांमधून टिळक इंग्रजांवर तुटून पडत.
टिळक जहालवादी होते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्त सांडावेच लागेल, नाहीतर मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत राहणार नाही, असे ते मानत. “कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहील मी” असे ते म्हणत. आणि अश्याच आत्मविश्वासाने त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. चाफेकर बंधूंसारख्या कित्येक युवकांना स्वराज्यासाठी क्रांती करण्यास त्यांनी प्रेरित केले.
इंग्रज सरकारशी लढताना १९०८साली राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली. म्यानमारमधील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी ही शिक्षा भोगली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, त्यांनी तिथे गीतारहस्य हा ग्रंथ लिहीला. ८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते.
टिळक नेहमी म्हणत फक्त जेव्हा लोखंड गरम असेल तेव्हाच त्याच्यावर प्रहार करा आणि तुम्हाला निश्चितच यश मिळेल.
टिळक म्हणत, “कर्तव्य मार्गावर गुलाब-पाणी शिंपडले जात नाही, किंवा त्यात गुलाबही उगवत नाहीत.
“देशकार्य म्हणजेच देवकार्य” हा विचार त्यांनी भारतातल्या कित्येक लोकांमध्ये रुजवला आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं.
महात्मा गांधींनी त्यांना "आधुनिक भारताचा निर्माता" म्हटले
टिळक म्हणाले, "मी भारताला माझी मातृभूमी आणि माझी देवी मानतो, भारतातील लोक माझे नातेवाईक आहेत आणि त्यांच्या राजकीय आणि सामाजिक मुक्तीसाठी निष्ठावान आणि स्थिर कार्य करणे हा माझा सर्वोच्च धर्म आणि कर्तव्य आहे"
भारतमातेच्या या अनमोल रत्नाचे १ ऑगस्ट १९२० रोजी आजारपणामुळे निधन झाले.
भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे असे थोर व्यक्तिमत्त्व आपल्याला लाभले, याचा मला फार अभिमान आहे. अशा या महान नेत्याला कोटी कोटी प्रणाम करून शेवटी एवढेच म्हणेल.
- संविधान दिन प्रश्न मंजुषा
- ५ सप्टेंबर शिक्षक दिवस प्रश्न मंजुषा
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रश्न मंजुषा
- लोकमान्य टिळक प्रश्न मंजुषा
- आंतरराष्ट्रीय योगा दिवस प्रश्न मंजुषा
- महाराणी राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रश्न मंजुषा
- शिव राज्याभिषेक दिवस प्रश्न मंजुषा
- स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्न मंजुषा
- गुरु पौर्णिमा प्रश्न मंजुषा
राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा 👇👇👇👇
%20(1).png)
0 Comments