स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा 2024
स्वातंत्र्यवीर सावरकर थोडक्यात जीवन व कार्य
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महान देशभक्त, जहाल क्रांतिकारक, झुंजार स्वातंत्र्यसेनानी, धैर्याचे मेरुमणी, प्रतिभासंपन्न कवी, सिध्दहस्त लेखक, नाटककार, प्रखर बुद्धिवादी, विज्ञानवादी, हिंदुत्ववादी, तत्त्वनिष्ठ राजकारणी, सहस्रावधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे वक्ते, चिंतनशील, कर्ते समाजसुधारक, भाषा शुध्दीचे प्रवर्तक आणि यंत्रयुगाचे समर्थक असे विविध पैलू होते.
वीर सावरकर यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते. त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर गावी झाला .त्यांच्या आईचे नाव राधाबाई सावरकर आणि वडिलांचे नाव दामोदरपंत सावरकर होते .ते अवघे नऊ वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा सांभाळ त्यांचे थोरले बंधू बाबाराव आणि त्यांची पत्नी येसूवहिनी यांनी केला
ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र हया रचना केल्या.चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.
मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले
त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला नंतर ते उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर हया आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही सघटना हया गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत हया संघटनेत रूपांतर झाले.
इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला
वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५००हन जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोडया मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते" "तानाजीचा पोवाडा" हया कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.'सागरा प्राण तळमळला' या कवितेला २००९ साली १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत
१९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.
- संविधान दिन प्रश्न मंजुषा
- ५ सप्टेंबर शिक्षक दिवस प्रश्न मंजुषा
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रश्न मंजुषा
- लोकमान्य टिळक प्रश्न मंजुषा
- आंतरराष्ट्रीय योगा दिवस प्रश्न मंजुषा
- महाराणी राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रश्न मंजुषा
- शिव राज्याभिषेक दिवस प्रश्न मंजुषा
- स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्न मंजुषा
- गुरु पौर्णिमा प्रश्न मंजुषा
महाराष्ट्र शिक्षक पॅनल

0 Comments