Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

गुरुपोर्णिमा 2024 | guru purnima speech in marathi | राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा | Muttepawar Sir

 गुरुपौर्णिमा

नमस्ते विद्यार्थी मित्रांनो,

सर्वप्रथम आपणास गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.   

विद्यार्थी मित्रांनो,

i) सर्वप्रथम आपण दहा ओळी मध्ये अत्यंत सोप्या भाषेमध्ये भाषण पाहणार आहोत 

ii) गुरुपौर्णिमेच्या संदर्भात सविस्तरपणे आपण माहिती घेणार आहोत  

iii) दिलेल्या माहितीच्या आधारावर एक राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा आपण सोडवणार आहोत

गुरुपोर्णिमा 2024 | guru purnima speech in marathi | राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा | Muttepawar Sir

गुरुपौर्णिमा १० ओळी भाषण मराठी

1) सर्वांना सप्रेम नमस्कार.

2) आदरणीय मुख्याध्यापक , पूजनीय गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो,

3) माझे नाव -------- आहे.

4) आज आपण गुरुपौर्णिमा हा सण साजरा करत आहोत.

5) दरवर्षी आषाढ शुध्द पौर्णिमेला 'गुरुपौर्णिमा' साजरी केली जाते.

6) या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.

7) भारतीय संस्कृतीत गुरूला अतिउच्च स्थान दिले आहे.

8)  गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतात.

9) हा दिवस गुरुंविषयी सन्मान व कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे.

10) आपण फक्त आजच्याच दिवशी नाही तर नेहमी आपल्या गुरुंचा आदर केला पाहिजे

जय हिंद ......

गुरुपौर्णिमा सविस्तर माहिती

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।

गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे. हे गुरू उत्क्रांत किंवा प्रबुद्ध मानव मानले जातात जे कर्मयोगावर आधारित त्यांचे ज्ञान शिष्यांना देतात. गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतान सह जगभरामध्ये हिंदू, जैन, शिख, बौद्ध व अन्य धर्मीयांद्वारे साजरा केला जातो.

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आषाढ (जून-जुलै) या हिंदू महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. कारण हा दिवस म्हणजे महाभारताचे लेखक आणि वेद संकलित करणारे ऋषी वेद व्यास यांचा जन्मदिवस आहे. म्हणून या दिवशी व्यास यांची पूजा करण्याची प्रथा आहे.

महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ आहे. महाभारतात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते

व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.

दत्तभक्तांसाठी हा पूण्यपावन दिवस ! या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतो. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूढील वाटचालीसाठी आशिर्वाद घेतो. वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा इश्वरभक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे मुमुक्षु - पारमार्थिक या दिवशी भक्तीभावाने गुरुंचे पूजन करतात व गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करतात. 

भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन चाणक्य-चंद्रगुप्त , रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद , रमाकांत आचरेकर - सचिन तेंडुलकर , ॲरिस्टॉटल-अलेक्झांडर ,  अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.

भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.

गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.

गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लावू?’ हेच खरे आहे.

गुरु बिन ज्ञान न उपजैगुरु बिन मिलै न मोष।
गुरु बिन लखै न सत्य कोगुरु बिन मैटैं न दोष।।

अर्थ :- कबीरदासजी म्हणतात- हे संसारी जीवांनो. गुरूशिवाय ज्ञान मिळणे अशक्य आहे. मग माणूस अज्ञानाच्या अंधारात भरकटतो आणि गुरूंचा आशीर्वाद मिळेपर्यंत संसाराच्या मायाजालात अडकून राहतो. मोक्षाचा मार्ग दाखवणारा तो गुरु आहे. गुरूशिवाय सत्य-असत्याचे ज्ञान होत नाही. योग्य आणि अयोग्य यातील फरक कळत नसेल तर मोक्ष कसा मिळणार? म्हणून गुरूंच्या आश्रयाला जा. फक्त गुरुच तुम्हाला सत्य दाखवतील.

जाका गुरु है आंधराचेला खरा निरंध।
अनेधे को अन्धा मिलापड़ा काल के फंद।।

तात्पर्य :- जर गुरु स्वतः अज्ञानी असतील तर शिष्य कधीही ज्ञानी होऊ शकत नाही, म्हणजे शिष्य ज्याप्रमाणे आंधळ्याला मार्ग दाखवायला आंधळा सापडतो, तसाच प्रकार घडतो. असे गुरू आणि शिष्य काळाच्या चक्रात अडकून आपले आयुष्य वाया घालवतात.

जैसी प्रीती कुटुम्ब कीतैसी गुरु सों होय।
कहैं कबीर ता दास कापला न पकड़े कोय।।

अर्थ :- हे मानवा, तुझ्या गुरूवर जसे तुझ्या कुटुंबावर प्रेम कर. जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. कबीरजी म्हणतात की अशा सेवकाला कोणीही मायेच्या बंधनात बांधू शकत नाही, त्याला मोक्ष मिळेल यात शंका नाही.

गुरु गोविंद दोऊ खड़े, काके लागू पाय।

बलिहारी गुरु आपनो, जिन गोविंद दियो बताय ।।

अर्थ :- या दोह्याचा अर्थ असा आहे की माझ्यासमोर गुरू आणि देव दोघेही उभे आहेत, पण गुरूंनी भगवंताला जाणण्याचा मार्ग दाखवला आहे.

या म्हणीचा तात्पर्य असा आहे की जेव्हा गुरू आणि देव दोघेही समोर असतात तेव्हा प्रथम गुरूंच्या चरणी मस्तक टेकवले पाहिजे, कारण भगवंतापर्यंत पोहोचण्याचे ज्ञान गुरूंनीच दिले आहे.

राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा 👇👇👇

 

1/10
गुरुपौर्णिमा ......... महिन्यात साजरी केली जाते ?
जून-जुलै (आषाढ)
सप्टेंबर-ऑक्टोबर (भाद्रपद)
मार्च-एप्रिल (चैत्र)
डिसेंबर-जानेवारी (पौष)
2/10
महर्षि वेदव्यास .......याचे रचयिता होत .
रामायण
महाभारत
रामचरितमानस
महाभाष्य
3/10
भगवान श्रीकृष्णाच्या गुरूचे नाव काय आहे ?
नारद ऋषी
व्यास
विश्वामित्र
सांदीपनी
4/10
खालीलपैकी कोणता गुण चांगल्या गुरूचा आहे?
नम्रता
करुणा
ज्ञान
वरील सर्व
5/10
सचिन तेंडूलकरच्या गुरूचे नाव काय आहे?
सुनील गावस्कर
कपिल देव
रमाकांत आचरेकर
संजय मांजरेकर
6/10
खालीलपैकी कोणता गुण शिष्याचा आहे ?
नम्रता
अहंकार
क्रोध
अलिप्तता
7/10
शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु ......होत.
गुरु अर्जनदेव
गुरु रामदास
गुरु गोविंदसिंग
गुरु नानकदेव
8/10
हिंदू पौराणिक कथांमध्ये देवांचे गुरू कोणाला मानले जाते ?
आदि शंकराचार्य
रामानुजाचार्य
बृहस्पती
मध्वाचार्य
9/10
संत नामदेव महाराज यांच्या गुरूचे नाव .....आहे .
विसोबा खेचर
संत तुकाराम
संत ज्ञानेश्वर
संत निवृत्तीनाथ
10/10
गुरु बिन ज्ञान न उपजै, गुरु बिन मिलै न मोष। गुरु बिन लखै न सत्य को, गुरु बिन मैटैं न दोष।। ह्या दोह्याची रचना कोणी केली ?
संत चोखामेळा
संत सावतामाळी
संत कबीरदास
संत तुलसीदास
Result:

Post a Comment

0 Comments