Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

स्वातंत्र्यप्राप्ती स्वाध्याय इयत्ता आठवी | इतिहास व नागरिकशास्त्र | Muttepawar Sir

 स्वातंत्र्यप्राप्ती स्वाध्याय इयत्ता आठवी

स्वातंत्र्यप्राप्ती स्वाध्याय इयत्ता आठवी | इतिहास व नागरिकशास्त्र | Muttepawar Sir

अत्यंत महत्वपूर्ण MCQ   For NMMS / MTSE/ इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा

स्वाध्याय  संपूर्ण उत्तरासह  येथे क्लिक करा 

१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

१) हंगामी सरकारचे पं.जवाहरलाल नेहरू  हे प्रमुख होते.
 
(अ) वल्लभभाई पटेल           (ब) महात्मा गांधी      (क) पं.जवाहरलाल नेहरू     (ड) बॅ.जीना

2) भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना लॉर्ड माउंटबॅटन यांनी तयार केली.
 (अ) लॉर्ड वेव्हेल  (ब) स्टॅफर्ड क्रिप्स (क) लॉर्ड माउंटबॅटन (ड) पॅथिक लॉरेन्स
 
२.  पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) बॅ. जीना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला ?
उत्तर : बॅ. जीना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राच्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला.

(२) त्रिमंत्री योजनेत सहभागी असलेल्या मंत्र्यांची नावे लिहा.
उत्तर : त्रिमंत्री योजनेत पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए. व्ही. अलेक्झांडर हे तीन ब्रिटिश मंत्री सहभागी होते.

3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) राष्ट्रीय सभेने फाळणीस मान्यता दिली.
उत्तर : i) माउंटबॅटन यांनी भारताच्या फाळणीची योजना प्रमुख नेत्यांसमोर ठेवली.
ii) देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार असल्याने तिने फाळणीला विरोध केला.
iii) मुस्लीम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास धरल्यामुळे देशभर हिंसाचार उद्भवला. फाळणी शिवाय दुसरा पर्याय उरला नसल्यामुळे अत्यंत नाइलाजाने राष्ट्रीय सभेने फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली.

(२) हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही.
उत्तर : i) मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे, ही मुस्लीम लीगची मागणी होती.
ii) मुस्लीम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला.
iii) सुरुवातीच्या काळात नकार देणारी मुस्लीम लीग काही काळानंतर हंगामी सरकारमध्ये सामील झाली.
iv) परंतु लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्याने  हंगामी सरकारचा कारभार सुरळीतपणे चालू शकला नाही.

(३)  वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही.
उत्तर : (i) भारताचे व्हाइसरॉय वेव्हेल यांनी सिमला येथे   भारतातील प्रमुख राजकीय पक्षांच्या बैठकीत सादर केलेल्या योजनेवर एकमत झाले नाही.
(ii)  व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळातील मुस्लीम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लीम लीगलाच असावा, असा आग्रह बॅरिस्टर जीना यांनी धरला.
(iii) राष्ट्रीय सभेने या गोष्टीला विरोध केला, त्यामुळे वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही.
 
४. दिलेल्या कालरेषेवर घटनाक्रम  लिहा.


५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

(१) ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावले का उचलली ?
उत्तर : (i) दुसऱ्या महायुदधाच्या काळात भारतीय स्वातंत्र्यलढा अधिक व्यापक झाला.
(ii) १९४२ साली सुरू झालेले 'चले जाव‘ आंदोलन तीव्र झाले.
(iii) आझाद हिंद सेनेच्या कार्याने ब्रिटिशांच्या सैन्यातील भारतीय सैन्याने प्रेरणा घेऊन उठाव केले.
(iv) भू सेना, वायू सेना व नौदलाने केलेल्या उठावांमुळे ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला.
(v) अशा स्थितीत मुस्लीम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करून हिंसक दंगली सुरू केल्या.
(vi) स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढत चालल्याने ब्रिटिश सरकारला याची गंभीर दखल घ्यावी लागली.
(vii) भारतातील आपली सत्ता यापुढे टिकू शकणार नाही, याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली.
(viii) भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी सरकार विविध योजना तयार करू लागले. भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने सरकारची पावले पडू लागली.

(२)  माउंटबॅटन योजनेविषयी माहिती लिहा.
उत्तर : i) भारताला स्वातंत्र्य देण्यासाठीच्या प्रत्येक योजनेला मुस्लीम लीगने स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीसाठी विरोध केला.
ii) देशातील वाढता हिंसाचार पाहून अखेरीस प्रधानमंत्री अॅटली यांनी इंग्लंड जून १९४८ पूर्वी भारतावरील सत्ता सोडून देईल, असे घोषित केले.
iii) भारतातील सत्तांतरासाठी लॉर्ड माउंटबॅटन यांची भारताचे व्हाइसरॉय म्हणून नियुक्ती करण्यात आली.
iv) माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचारविनिमय करून आपली योजना त्यांच्यासमोर मांडली.
v) या योजनेनुसार भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना त्यांनी तयार केली.
vi) मुस्लीम लीगच्या अट्टहासामुळे नाइलाज झाल्याने राष्ट्रीय सभेने फाळणीच्या या माउंटबॅटन योजनेला मान्यता दिली.
vii) ब्रिटिश पार्लमेंटने माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर केला.

(३) १६ ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे मुस्लीम लीगने का जाहीर केले ? त्याचे कोणते परिणाम झाले ?
उत्तर : (i) स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीवर मुस्लीम लीग ठाम होती.
(ii) त्रिमंत्री योजनेत मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद नव्हती, त्यामुळे मुस्लीम लीगने त्रिमंत्री योजना फेटाळली.
(iii) पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून असंतुष्ट झालेल्या लीगने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले.
(iv) १६ ऑगस्ट १९४६ हा प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले.
(v) या दिवशी लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला.
(vi) देशभरात विविध ठिकाणी हिंदू-मुस्लीम यांच्यात दंगली झाल्या.
(viii) बंगाल प्रांतात नोआखाली या भागात भीषण कत्तली झाल्या.
(viii) अखेरीस फाळणी होऊनच देश स्वतंत्र झाला.

Post a Comment

0 Comments