Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा | 10 ओळी मध्ये अत्यंत सोप्या भाषेमध्ये भाषण | Muttepawar Sir

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

नमस्ते विद्यार्थी मित्रांनो,

i) सर्वप्रथम आपण 10 ओळी मध्ये अत्यंत सोप्या भाषेमध्ये भाषण पाहणार आहोत 

ii) अण्णाभाऊ साठे यांच्या  संदर्भात सविस्तरपणे आपण माहिती (निबंध) पाहणार आहोत.  

iii) दिलेल्या माहितीच्या आधारावर एक राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा आपण सोडवणार आहोत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा | 10 ओळी मध्ये अत्यंत सोप्या भाषेमध्ये भाषण | Muttepawar Sir

10 ओळी भाषण मराठी

1) सर्वांना सप्रेम नमस्कार......

2) आदरणीय मुख्याध्यापक,पूजनीय गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो,

3) माझे नाव -------- आहे.

4) सर्वप्रथम सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप शुभेच्छा..!

5) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 01 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला.

6) अण्णाभाऊ साठे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते.

7) अण्णाभाऊ साठेनी कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, पटकथा, लावणी यांची निर्मिती केली. त्यांची ‘मुंबईची लावणी’ व ‘माझी मैना गावावर राहिली’ या लावण्या अविस्मरणीय आहेत.  

 8) रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते.

9) ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव’ हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले.

10) ‘फकीरा’ या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला.

सविस्तर माहिती (निबंध )

अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती - मधुकर, शांता आणि शकुंतला.

अण्णाभाऊंचे शालेय शिक्षण झालेले नाही. याचे कारण म्हणजे, सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी अवघ्या दीड दिवसामध्येच शाळेत जाणे सोडून दिले होते.

मोजकेच शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ लहानपणीच आपल्या वडिलांसोबत मुंबई येथे आले. मुंबईमध्ये अंगावर पडेल ते काम त्यांनी केले.

गिरणीमध्ये झाडूवाल्याची नोकरी पासून ते कोळसे वेचण्यापर्यंत सर्व कामे त्यांनी केली. गरिबीने ताटतुट केली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला वेळ होती ती भल्या पहाटेची बांधाबांध जाण्याची तुकड्याची" झाली भाकर या कवितेतून त्यांनी आपला मुंबई प्रवासाचा अनुभव व्यक्त केलेला दिसतो.

१९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते.

अण्णाभाऊ साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरू मानायचे "जग बदल घालुनी घाव, सांगुन गेले मज भीमराव" असे अण्णाभाऊ म्हणायचे. आपल्याला अजमार साहित्यातून त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडून आणले. मुबई ही महाराष्ट्रातून वेगळी होऊ नये यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा केवळ महाराष्ट्रात आणि भारतातच नाही तर रशियामध्ये गायला.

अण्णाभाऊंनी दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. इ.स. १९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे"

त्यांनी आपल्या जीवन काळात विविध विषयावर लेखन केले. त्यांनी जवळपास २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णने, कथा, कविता, गीते इत्यादी क्षेत्रात त्यांनी समृद्ध लेखन केले आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातून समाजातील वैर नष्ट करण्याचे सामर्थ्य दिसून येते. वैजयंता आणि फकिरा ह्या त्यांच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत.

अण्णाभाऊंनी पोवाडा आणि अध्यात्मिक गाणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींचा वापर केल्याने त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास आणि लोकप्रिय होण्यास मदत झाली. फकिरामध्ये साठे यांनी फकिरा या नायकाचे चित्रण केले आहे, जो आपल्या समाजाला उपासमार होण्यापासून वाचवण्यासाठी ग्रामीण सनातनी व्यवस्थेविरुद्ध आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड करत आहे. नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अटक केली आणि छळ केला आणि शेवटी फकिराला फाशी देऊन ठार केले.

मुंबईच्या शहरी वातावरणाने त्यांच्या लेखनावर लक्षणीय प्रभाव पाडला, ज्यात ते एक डिस्टोपियन वातावरण म्हणून चित्रित होते. आरती वाणी यांनी त्यांच्या दोन गाण्यांचे वर्णन केले आहे - "मुंबईची फक्कड" (मुंबईचे गाणे) आणि "मुंबई चा गिरणी कामगार" (मुंबईचा मिल-हात) - "बलात्कार, शोषण, असमान आणि अन्यायी" शहराचे चित्रण करते

"माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीय काहीली. अशा सुंदर कविताही त्याच्या गाजलेल्या आहेत.

साठे यांचे स्मरण 1 ऑगस्ट 2002 रोजी इंडिया पोस्टने विशेष 4 चे टपाल तिकीट देऊन केले. पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक  आणि कुर्ल्यातील उड्डाणपुलासह इमारतींनाही त्यांचे नाव देण्यात आले.

2022 मध्ये मॉस्कोमधील मार्गारीटा रुडोमिनो ऑल-रशिया स्टेट लायब्ररी फॉर इंटरनॅशनल लिटरेचरमध्ये साठे यांचा पुतळा स्थापित करण्यात आला .

या महान लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे १८ जुलै १९६९ साली निधन झाले.

 

राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा 👇👇👇👇👇

1/10
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कधी झाला ?
13 ऑक्टोबर 1936
11 ऑगस्ट 1922
01 ऑगस्ट 1925
01 ऑगस्ट 1920
2/10
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कोणत्या गावी झाला?
चिखली
मालेगाव
वाटेगाव
वाजेगाव
3/10
अण्णाभाऊ साठे यांच्या आईचे नाव काय?
पार्वतीबाई
वालूबाई
लक्ष्मीबाई
राधाबाई
4/10
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती ?
फकिरा
ययाति
श्यामची आई
झेंडूची फुले
5/10
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शाळा किती दिवस शिकली ?
दीड दिवस
अडीच दिवस
चार दिवस
पाच दिवस
6/10
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची वडिलांचे नाव काय होते ?
श्यामराव
तुकाराम
रामराव
भाऊराव
7/10
अण्णा भाऊ साठे यांना कोणती पदवी दिली गेली आहे ?
महात्मा
राजर्षी
लोकशाहीर
लोकमान्य
8/10
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्यावर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव होता?
शिवसेना
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
काँग्रेस
भाजप
9/10
१९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी कोणते कला पथक स्थापन केले ?
मैना
पिवळा बावटा
फकीरा
लालबावटा
10/10
आण्णाभाऊ साठे यांचे निधन कधी झाले ?
१ जून १९५८
१८ जुलै १९६९
१ ऑगस्ट १९८४
५ सप्टेंबर १९७९
Result:



Post a Comment

0 Comments