Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

शिक्षक दिवस | Speech On Teachers Day | शिक्षक दिन भाषण मराठी , हिंदी , इंग्रजी | राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा | Muttepawar Sir

शिक्षक दिवस (५ सप्टेंबर )

नमस्ते विद्यार्थी मित्रांनो,

i) सर्वप्रथम आपण 10 ओळी मध्ये अत्यंत सोप्या भाषेमध्ये मराठी , हिंदी, इंग्रजी भाषण पाहणार आहोत. 

ii) शिक्षक दिवस संदर्भात सविस्तरपणे आपण माहिती (निबंध) पाहणार आहोत.  

iii) एक राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा आपण सोडवणार आहोत.


शिक्षक दिवस | Speech On Teachers Day | शिक्षक दिन भाषण मराठी , हिंदी , इंग्रजी | राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा | Muttepawar Sir


5 सप्टेंबर भाषण मराठी ( शिक्षकदिन )

1) सर्वांना सप्रेम नमस्कार

2) आदरणीय मुख्याध्यापक , पूजनीय गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो,

3) माझे नाव -------- आहे.

 4) 5 सप्टेंबर या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो.

5) दरवर्षी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

6) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य केले

7) ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते.

8) शिक्षक समाजातील प्रमुख आधारस्तंभ मानला जातो.

9) तो भावी पिढी घडवण्याचे काम करतो.
10) ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या मडक्याला आकार देतो म्हणजेच घडवतो
  त्याप्रमाणे शिक्षक हा आपल्या आपल्या विद्यार्थ्याला घडवतो.

जय हिंद जय महाराष्ट्र..

5 September speech Teacher’s Day

1) Hello everyone

2) Respected Principal, Teacher and my all Friends,

3) My name is --------.

4) 5th September is the birthday of Dr. Sarvepalli Radhakrishnan.

5) Every year this day is celebrated as Teacher's Day.

6) Dr. Sarvepalli Radhakrishnan did valuable work in the field of education

7) He was the second President of India.

8) Teachers are considered as the main pillar of the society.

9) He works to build the future generation.

10) As a potter shapes a clay pot, a teacher shapes his student. Jay Hind

 

5 सितंबर भाषण हिंदी  (शिक्षक दिन )

1) सभी को नमस्कार

2) प्रधानाचार्य, गुरुजन वर्ग और मेरे बालमित्रो,

3) मेरा नाम -------- है।

4) 5 सितंबर को डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन का जन्मदिन है।

5) हर साल इस दिन को शिक्षक दिवस के  रूप में मनाया जाता है।

6) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ने शिक्षा के क्षेत्र में बहुमूल्य कार्य किया है।

7) वह भारत के दूसरे राष्ट्रपति थे।

8) शिक्षकों को समाज का मुख्य स्तंभ माना जाता है।

9) वह भावी पीढ़ी के निर्माण के लिए कार्य करता है।

10) जैसे कुम्हार मिट्टी के बर्तन को आकार देता है, वैसे ही एक शिक्षक अपने छात्र को आकार देता है।

 

शिक्षक दिवस सोप्या शब्दात निबंध

शिक्षक ईश्वर से बढ़कर है,

ये कबीर बतलाते है।

क्योंकि शिक्षक ही भक्तों को,

ईश्वर तक पहुँचाते हैं।

भारतीय संस्कृतीत आईवडीलानंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते शिक्षकांना. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम शिक्षक करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात शिक्षकांचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. शिक्षक दिवस हा कोणत्याही शिक्षक आणि विद्यार्थ्यासाठी एक खास प्रसंग असतो. शिक्षकांना आदर आणि प्रेम देण्यासाठी भारतभर दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो. 5 सप्टेंबर हा महान शिक्षक आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवस आहे.

1962 मध्ये, जेव्हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी 5 सप्टेंबर हा विशेष दिवस म्हणून साजरा करण्याची परवानगी मागितली. तेव्हा राधाकृष्णन म्हणाले, 'माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला अभिमान वाटेल. त्यांच्या इच्छेनुसार 1962 मध्ये पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. ते जगाला एक चांगले स्थान बनवतात. शिक्षक आपल्याला केवळ विषयच शिकवत नाहीत तर ते कोणत्याही व्यक्तीसाठी अभ्यासापेक्षा अधिक महत्त्वाचे असलेल्या नैतिक मूल्यांमध्ये सुधारणा करून विद्यार्थी म्हणून वाढण्यास मदत करतात. एक चांगला शिक्षक मेणबत्तीसारखा असतो जो स्वतः जळतो आणि इतरांना प्रकाश देतो. जसे म्हणतात, "एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन संपूर्ण जग बदलू शकते."

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या आयुष्यातील ४० वर्षे शिक्षक म्हणून देशासाठी समर्पित केली होती. शिक्षकांचा आदर करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. समाजाला योग्य दिशा देण्यात खरा शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतो, अशी त्यांची धारणा होती. खरा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यास शिकवतो आणि त्यांचे जीवन सुधारण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतो, म्हणून शिक्षकांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. हा दिवस शिक्षकांनी केलेल्या सर्व योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक उत्तम संधी आहे.

सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात -  प्रामाणिकपणा, धैर्य, सत्यता आणि शिस्त यासारख्या सद्गुणांसह ते मजबूत चारित्र्याच्या संभाव्य सामर्थ्याचे स्पष्टीकरण देतात. मानवी जीवनाचे अंतिम ध्येय सर्वमुक्ती असले पाहिजे, म्हणजे जीवन आणि मृत्यूच्या चक्रासह सर्व सांसारिक दु:खांपासून मुक्ती.

शिक्षक दिवस राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा 👇👇👇👇

1/10
कोणाचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो?
महात्मा गांधी
सर्वपल्ली राधाकृष्णन
पंडित जवाहरलाल नेहरू
डॉ राजेंद्र प्रसाद
2/10
भारतात शिक्षक दिन साजरा करायला कधीपासून सुरुवात झाली ?
1950
1972
1962
1975
3/10
सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारताचे पहिले ....... काम केले.
पंतप्रधान
राष्ट्रपती
उपराष्ट्रपती
गृहमंत्री
संरक्षणमंत्री
4/10
डॉ राधाकृष्णन यांचा मृत्यू कोठे झाला?
मदुराई
दिल्ली
मुंबई
मद्रास
5/10
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारताचे .........राष्ट्रपती म्हणून काम केले.
पहिले
दुसरे
तिसरे
चौथे
6/10
डॉ. राधाकृष्णन यांना कोणत्या वर्षी भारतरत्न प्रदान करण्यात आले ?
1948
1954
1964
1974
7/10
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म कधी झाला ?
5 सप्टेंबर 1872
5 सप्टेंबर 1888
5 सप्टेंबर 1899
5 सप्टेंबर 1869
8/10
कोणता दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो ?
5 सप्टेंबर
5 ऑक्टोबर
5 जानेवारी
5 जुलै
9/10
डॉ. राधाकृष्णन यांच्या आईचे नाव ..... होते.
सीतम्मा
गीता
लक्ष्मी
विरम्मा
10/10
डॉ. राधाकृष्णन 1931 ते 1936 पर्यंत ...... विद्यापीठाचे कुलगुरू होते .
आंध्र
दिल्ली
बनारस
कोलकाता
Result:



Post a Comment

0 Comments