शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा 2024
शिवराज्यभिषेक दिन
छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला आणि एका सार्वभौम राज्याचा जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा. 'मराठ्यांचे बंड' नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या राज्याभिषेकाने पटवून दिले. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. · महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरापगड जातीच्या भूमीपूत्र मावळ्याच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र लढा आरंभ करुन गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मने आणि मनगटे स्वतंत्र, स्वराज्याच्या प्रेरणेने जिवंत बनवली. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांना आदिलशाही, मुघलांशी लढा देताना स्वकीयांचाही सामना करावा लागला होता. विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारले. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. स्वतंत्र राज्याची 'राज्याभिषेक शक' ही नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी (मराठी) लिपीतील नाणी चलनात आणली.
निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते. इंग्रजांनी ऑक्झिंडेन नावाचा आपला वकील नजराणा घेऊन पाठवला होता. हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजनही जमा झाले होते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली. शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली.
- संविधान दिन प्रश्न मंजुषा
- ५ सप्टेंबर शिक्षक दिवस प्रश्न मंजुषा
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रश्न मंजुषा
- लोकमान्य टिळक प्रश्न मंजुषा
- आंतरराष्ट्रीय योगा दिवस प्रश्न मंजुषा
- महाराणी राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रश्न मंजुषा
- शिव राज्याभिषेक दिवस प्रश्न मंजुषा
- स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्न मंजुषा
- गुरु पौर्णिमा प्रश्न मंजुषा

0 Comments