NMMS Exam 2024-25
NMMS Exam 2024 याबद्दलची सविस्तर माहिती त्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरुप , महत्व , उद्देश, पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, परिक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, निवड पद्धती अशी सविस्तर माहिती आपणास मिळणार आहे.
NMMS ही राष्ट्रीय स्तरावरील शालेय विद्यार्थी इ ८ वी मध्ये शिकत असलेल्या मुलांसाठी केंद्र शासनाने सुरु केलेली शिष्यवृत्ती योजना आहे. NMMS चा Full Form 'National Means cum Merit Scholarship Scheme Exam' असा आहे. त्यालाच मराठी मध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा असे म्हणतात.
सन २००७- ०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध
घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या
विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.
१. अर्ज करण्याची पध्दत :- दिनांक ०५/१०/२०२४ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या
https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.
२. पात्रता :-
a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.
b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२३-२४ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.
c) विद्यार्थी/विद्यार्थ्यीनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत
जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला
असावा.)
d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
• विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
· केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
• जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
• शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
• सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.
3. विद्यार्थ्यांची निवड :- विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
४. परीक्षेचे वेळापत्रक :- महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
(SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)
a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव,
विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
b) शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यतः इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर
आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण -३५)
३. गणित (एकूण गुण - २०) असे तीन विषय असतील.या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे
असतात.
उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
a. सामान्य विज्ञान ३५ गुण :- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
b. समाजशास्त्र ३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण
c. गणित २० गुण.
उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.
🟣 Nmms Exam 2024
🌍 विषय - भूगोल (MCQ) 1️⃣ स्थानिक वेळ व प्रमाण वेळ
2️⃣ पृथ्वीचे अंतरंग
3️⃣ आद्रता आणि ढग
4️⃣ सागरतळ रचना
5️⃣ सागरी प्रवाह
6️⃣ भूमी उपयोजन
7️⃣ लोकसंख्या
8️⃣ उद्योग
9⃣ , 🔟 नकाशा प्रमाण व क्षेत्राभेट
🌹 विषय - नागरिकशास्त्र
1️⃣ संसदीय शासन पद्धतीची ओळख
2️⃣ भारताची संसद
3️⃣ केंद्रीय कार्यकारी मंडळ
4️⃣ भारतातील न्यायव्यवस्था
5️⃣ राज्यशासन
6️⃣ नोकरशाही
💥 विषय - इतिहास नागरिकशास्त्र
1️⃣ इतिहासाची साधने
2️⃣ युरोप आणि भारत
6️⃣ स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ
7️⃣ असहकार चळवळ
9️⃣ स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व
1️⃣0️⃣ सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
1️⃣1️⃣ समतेचा लढा
1️⃣2️⃣ स्वातंत्र्यप्राप्ती
1️⃣3️⃣ स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती
1️⃣4️⃣ महाराष्ट्र राज्याची निर्मिती
NMMS परीक्षा संपूर्ण माहिती | NMMS Exam
Information in Marathi
%20(1).png)
0 Comments