Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

ssc board exam july 2024 | इतिहास व राज्यशास्त्र बोर्ड पॅटर्न प्रमाणे संपूर्ण उत्तरांसह | Muttepawar Sir

SSC board exam july 2024  

इतिहास व राज्यशास्त्र 

विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपणास बोर्ड परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .......

 या भागात आपण  दहावी बोर्ड परीक्षा  जुलै 2024  इतिहास राज्यशास्त्र या विषयाची  प्रश्नपत्रिका व त्याची बोर्ड पॅटर्न प्रमाणे संपूर्ण उत्तरे पाहणार आहोत.  यासंदर्भात आपल्याला काही अडचण असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तरे देऊत. चला तर मग सर्वप्रथम  प्रश्नपत्रिका  पीडीएफ स्वरूपात आणि उत्तरे चेक करून घ्या


ssc board exam july 2024 | इतिहास व राज्यशास्त्र बोर्ड पॅटर्न प्रमाणे संपूर्ण उत्तरांसह | Muttepawar Sir

प्रश्नपत्रिका  पीडीएफ येथे क्लिक करा 
उत्तरे 👇👇👇👇👇

1.(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा  03

(1) आधुनिक इतिहासलेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल.

(2) मथूरा शिल्पशैली कुशाण काळात उदयास आली.

(3) कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय होय.

(ब) पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा : 03

उत्तरे -

(1) (4) लिओपॉल्ड व्हॉन रांके - द हिस्टरीज्

(2) (2) ताडोबा - लेणी

(3) (4) बुद्धिबळ - मैदानी खेळ

2. (अ) सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा (कोणतेही दोन) :

(1) संकल्पनाचित्र पूर्ण करा : (उत्तर)


(2) खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा:(उत्तर)

याशिवाय 1) स्थानिक पर्यटन व आंतरराज्यीय पर्यटन 2) आरोग्यविषयक पर्यटन 3) क्रीडा पर्यटन    4) नैमित्तिक पर्यटन

(3) पुढील तक्ता पूर्ण करा:


(ब) थोडक्यात टिपा लिहा (कोणतेही दोन) :

(1) कला :- (i) आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते. आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहजप्रवृत्ती असते. या सहज प्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'कला' असे म्हणतात.

(ii)  'कला' ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते.

(iii)  ही मांडणी शिल्प, गायन, चित्र, नृत्य वा वादन अशा विविध रूपांत आविष्कृत होते.

(iv) कलानिर्मितीच्या मुळाशी कल्पकता, संवेदनशीलता, कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात.

(2) वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य

उत्तर : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले.

(i) लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली.

(ii) सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंब देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला.

(iii)  पाश्चात्त्यविदया व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाजप्रबोधनाचे काम केले.

(iv)  तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.

(3) शब्दकोश.

उत्तर : (i) शब्दांच्या अर्थांच्या कोशाला 'शब्दकोश' असे म्हणतात. वाचकांना शब्दांचा अर्थ सहजपणे समजावा व त्यांच्या शब्दांचा संग्रह वाढावा, या उद्देशाने शब्दकोशांची निर्मिती केली जाते.

(ii) शब्दकोशात शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची व्युत्पत्ती या बाबी दिलेल्या असतात.

(iii) शब्दकोश हे एकभाषी, द्विभाषी आणि बहुभाषी अशा तिन्ही प्रकारचे असतात.

(iv) सर्वसंग्राहक शब्दकोश, परिभाषाकोश, विशिष्ट शब्दकोश, व्युत्पत्तिकोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी-वाक्प्रचार संग्रह कोश असे शब्दकोशांचे महत्त्वाचे प्रकार आहेत.

3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) :

(1) बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.

(i) 'बखर' हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरविरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे या विषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते.

(ii) मराठी भाषेत विविधप्रकारचा बख़री उपलब्ध आहेत. यातील एक महत्त्वाची बखर 'सभासद बखर' होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते.

(iii) 'भाऊसाहेबाची बखर' या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित 'पानिपतची बखर' अशीही स्वतंत्र बखर आहे.

(iv) बखरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर कैफियत, पौराणिक आणि राजनीतिपर असे प्रकार आहे.

(v) होळकरांची फैकियत या बखरी तून होळकर घराण्याची माहिती कळते.

(2) तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.

(i) कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य अभियांत्रिकी इत्यादी मध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारणपरंपरेची साखळी समजावून घेणे.यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.

(ii) वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात.

(iii) मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते.

(iv) विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात. हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजावून घेणे आवश्यक असते.

(3) वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.

(i) एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा होतांना भूतकालात तशाच स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास वर्तमानपत्रे ती बातमीमध्ये चौकट देऊन छापतात. तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत जाता येते.

(ii) वर्तमानपत्रांमधील सदरांमध्ये पन्नास वर्षापूर्वी, शंभर वर्षापूर्वी अशाप्रकारची सदरे असतात. ती इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित असतात.अशाप्रकारच्या सदरांमधून आपणास भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटना समजतात. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास मदत होते.

(iii) वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहचवायच्या असतात. हे काम करत असतांना 'बातमी मागची बातमी' सांगावी लागते.

अशावेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते.

(4) विविध विषयांमधील कृतिसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

(i) इतिहासाची साधने मिळवणे, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे,हस्तलिखिते, जुने ग्रंथ, पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे.

(ii) या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात.

 (iii) त्या कामासाठी विविध विषयांमधील कृ्तीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. म्हणून योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात.

प्रश्न 4. दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा  4

महाराष्ट्रातील बाराव्या-तेराव्या शतकातील मंदिरांना 'हेमाडपंती' मंदिरे असे म्हणतात. हेमाडपंती मंदिराच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोनांमध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो. हेमाडपंती मंदिरांचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. दगडांमध्येच एकमेकांत घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. मुंबईजवळील अंबरनाथ येथील अंब्रेश्वर,नाशिकजवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाड़पंती मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंती मंदिरे पहावयास मिळतात.

प्रश्न :

(1) हेमाडपंती मंदिराच्या बाह्य भिंती कशा असतात ?.

उत्तर - हेमाडपंती मंदिराच्या बाह्य भिंती तारकाकृती असतात.

(2) हेमाडपंती मंदिराची उदाहरणे लिहा.

उत्तर - मुंबईजवळील अंबरनाथ, येथील अंब्रेश्वर, नाशिकजवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंती मंदिराची उदाहरणे आहेत.

(3) हेमाडपंती मंदिराची महत्त्वाची वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर - (i) मंदिराच्या भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो.

(ii) दगडांमध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू याच्या आधाराने भिंत उभारती जाते. (स्वमताला प्राधान्य)

5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) : 06

 (1) कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.

(i) एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली.

(ii) इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसामाणसामधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात.

(iii) समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो.

(iv) मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात. तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो. अशी मांडणी त्याने केली. त्याचा 'दास कॅपिटल' हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे.

(2) उपयोज़ित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो ?

(i) भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमानकाळात अस्तित्वात असतात.

(ii) त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावासा वाटतो.

(iii) ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे, परंपरांचे अवशेष असतात. तो आपला सांस्कृतिक वारसा असतो. ती आपली ओळख असते. त्याच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते.

 (iv) त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते.

(v) उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते.

(3) खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा.

(i) खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटल्या तरी सुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे.

(ii) इतिहासाच्या विद्यार्थ्यांना 'क्रीडा' क्षेत्रात अनेक संधी आहेत. ऑलिंपिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संदर्भातील लेखन, समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते.

(iii) खेळांच्या स्पर्धा सुरू असतांना त्याबद्दल समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ञांची आवश्यकता असते.

(iv) या तज्ञांना खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टीची माहिती देणे गरजेचे असते यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो.

(4) भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे ? ते उदाहरणासह स्पष्ट करा.

(i) भारतीय चित्रपटांच्या विकासात मदनराव माधवराव पितळे, कल्याणचे पटवर्धन कुटुंबीय आणि हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांचे योगदान आहे.

(ii) पुढे दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे आणि अ.प. करंदीकर, एस.एन. पाटणकर, व्ही.पी. दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांचे साहाय्य घेऊन 'पुंडलिक' हा कथापट 1912 मध्ये मुंबईत दाखवला.

(iii) 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आणि सर्व प्रक्रिया भारतात पूर्व केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला.

(iv) मोहिनी भस्मासूर, सावित्री-सत्यवान हे मूकपट आणि वेरूळची लेणी व नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही तीर्थक्षेत्रे यावर फ़ाळके यांनी अनुबोधपट तयार केले.

(v) भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो. 'भारतीय चित्रपटांची जननी' अशी महाराष्ट्राची ख्याती आहे.

6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :

(1) निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात.

(2) शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरितक्रांती करण्यात आली.

7 . पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) : 4

(1) संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.

(1) हे विधान बरोबर आहे :

कारण :

(i) संविधान प्रवाही असते. एखाद्या जिवंत दस्तएवाजाप्रमाने त्याचे स्वरूप असते.

(ii) पंरिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे.

(iii) संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संसदेला या तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिली.

(iv) संविधानात बदल करतांना संविधानाच्या मूलभूत चौकटीला संसदेला धक्का लावता येणार नाही. अशी भूमिका न्यायालयाने घेतली.

(विधान चूक किंवा बरोबर यास एक गुण व सकारणास एक गुण)

(2) निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते.

हे विधान बरोबर आहे :

कारण :

(i) भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय्य वातावरणात होण्यासाठी.

(ii) निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी.

(iii) निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमाचे पालन करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते.

(विधान चूक किंवा बरोबर यास एक गुण व सकारणास एक गुण)

(3) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.

हे विधान चूक आहे.

कारण

(i)  कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते.

ii) चळवळीचा कार्यक्रमआंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी-अधिक करायची बाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते.

iii) खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते.

म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते.

(विधान चूक किंवा बरोबर यास एक गुण व सकारणास एक गुण)

8. (अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा (कोणतेही एक) : 2

(1) राखीव जागाविषयक धोरण

(i)   भारतीय समाजातील काही लोकसमूह हे वर्षानुवर्षे सामाजिक न्यायापासून दूरच राहिले. शिक्षण आणि रोजगाराच्या संधींपासून ते दीर्घकाळ वंचित राहिले आहेत.

(ii) अशा लोकसमूहांना स्वातंत्र्योत्तर काळात मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक होते. म्हणून संविधानकारांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये विशिष्ट प्रमाणात राखीव जागा ठेवण्याचे धोरण स्वीकारले.

(iii)  त्यानंतर संसदेने इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद केली.

(iv)  राखीव जागांविषयक धोरणामुळे वंचित समाजघटकांना न्याय मिळून आपला विकास करण्याची संधी मिळाली आहे.

(2) प्रादेशिक पक्ष.

(i) विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना 'प्रादेशिक पक्ष' असे म्हणतात.

(ii) त्यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो. तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात.

(iii) प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात. आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकारांऐवजी स्वायत्तता आवश्यक वाटते.

(iv) संघशासनाला सहकार्य करत आपले स्वायत्ततेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करतात. 

(ब) दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा (कोणतेही एक) : 2

(1) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :


(2) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :


9. पुढील प्रश्नाचे उत्तर थोडक्यात लिहा (कोणतेही एक) : 2

(1) मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले ?

(i) युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले.

(ii)  आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला.

(iii) यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वांत मोठी लोकशाही बनली.

(iv) या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली. युवा वर्गाच्या राजकीय जाणिवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली.

(2) राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात ?

(i) गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यर्क्तींना काही वेळा राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते.

(ii) त्यामुळे राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व वाढते.

(iii) निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊ शकतो.

(iv) त्याचबरोबर निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण राखण्यात अडचणी येतात.

इयत्ता 10 च्या सर्व विषयाची परिपूर्ण तयारीसाठी वेब साइट चे Follow बटन क्लिक करा 💖

Muttepawar Sir या Youtube  channel ला भेट द्यां



Post a Comment

0 Comments