इतिहासाची साधने
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षा या भागात इतिहास नागरिकशास्त्र या विषयातील पहिला पाठ इतिहासाची साधने याचे महत्वाचे प्रश्न , Online Test , Youtube MCQ Video पाठ , स्वाध्याय पाहणार आहोत.
याच पद्धतीने संपूर्ण सामाजिक शास्त्राची तयारी करून घेणार आहोत ते पण सोप्य्या पद्धतीने .
Online Test 👇
स्वाध्याय
१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
१) इतिहासाच्या साधनांमधील दृक्-श्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
(अ) लिखित (ब) मौखिक (क) भौतिक (ड) दृक्-श्राव्य
(२) पुण्यातील आगाखान पलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी
माहिती मिळते.
(अ) आगाखान पॅलेस (ब) साबरमती आश्रम
(क) सेल्युलर जेल (ड) लक्ष्मी विलास पॅलेस
(3) विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय.
(अ) पोवाडा (ब) छायाचित्र (क) मुलाखती (ड) चित्रपट
२.पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करीत होती.
उत्तर : i) साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना ब्रिटिश काळातील वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचेही काम केले.
(ii) भारतीय संस्कृतीची थोरवी वर्णन करताना त्यांनी समाजातील दुष्ट चालीरीती, रूढी-परंपरा यांच्यावरही टीका केली.
(iii) स्त्रियांवरील अत्याचार,स्त्री-भ्रूणहत्या, बालविवाह, विधवा पुनर्विवाह इत्यादी सामाजिक प्रथावर लिखाण करून लोकमत जागृत केले.
(iv) इंग्रजांच्या जुलमाविरुद्ध लिखाण करतानाच पाश्चात्त्य विदया, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वातंत्र्य-समानता आदि मूल्ये यांचे महत्त्वही पटवून दिले. म्हणूनच ब्रिटिश काळातील वृत्तपत्रे ही सामाजिक प्रबोधनाचीही साधने ठरली.
(२) चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात.
उत्तर : चित्रफिती हा आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्त्वपूर्ण आविष्कार असून आधुनिक भारताच्या इतिहासा वर त्या प्रकाश टाकतात.
i) भारताच्या स्वातंत्र्यलढयातील महत्त्वपूर्ण घटना जशा घडल्या, त्या रूपात चित्रफितीमुळे आज आपल्याला पाहायला मिळतात.
ii) समाजजीवनातील एखादी चांगली घटना, आदर्श मूल्ये, आदर्श विचार यांवर चित्रपट निघतात.
iii) सामाजिक समस्या, रूढी, अंधश्रद्धा असे विषयही चित्रपटांतून हाताळले जातात.
iv) तत्कालीन सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटांत पडत असल्याने 'चित्रफिती' या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात.
प्रश्न 3 टिपा लिहा
(१) छायाचित्रे.
उत्तर : (i) छायाचित्रांमुळे व्यक्ती, वास्तू, प्रसंग वा घटना आहे त्या स्वरूपात दिसतात. छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्त्व होते.परंतु त्यात काल्पनिकता, व्यक्तिसापेक्षताही असे.
ii) छायाचित्रांवरून पूर्वीच्या व्यक्ती कशा होत्या, त्यांचे पेहेराव कसे होते यांची माहिती मिळते.
iii) घडत असलेल्या प्रसंगांचे छायाचित्रण सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा करते.
(iv) तत्कालीन वास्तूंच्या छायाचित्रांवरून वास्तुप्रकार,वास्तू बांधण्याच्या पद्धती यांची माहिती मिळते. त्यामुळे छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची विश्वसनीय दृक साधने मानली जातात.
(२) वस्तुसंग्रहालये आणि इतिहास.
उत्तर : i) जेथे प्राचीन वस्तू, भांडी, शस्त्रे, नाणी, कागदपत्रे, वस्त्रे इत्यादींची कलात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवलेल्या असतात, अशा संग्रहाला 'वस्तुसंग्रहालय' असे म्हणतात.
ii) या वस्तूंवरून तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक इतिहासाची माहिती मिळते.
iii) नाण्यांवरून त्या काळात वापरात असलेले धातू, लोकांची आर्थिक स्थिती यांची कल्पना येते.
iv) शिल्पकला, चित्रकला, धातुकला, शस्त्रकला इत्यादी कलांतील प्रगती समजते. वस्तुसंग्रहालये आणि इतिहास या दोन्ही बाबी अभिन्न आहेत.इतिहास लेखनाचे ते एक महत्त्वाचे साधन आहे.
(३) श्राव्य साधने.
उत्तर : i) ध्वनिमुद्रितांचा समावेश श्राव्य साधनांत होतो. ध्वनिमुद्रणकलेचा शोध लागल्यानंतर ही साधने इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्त्वाची ठरली.
ii) उत्तमोत्तम गायकांची गीते, संगीत, विद्वानांची व्याख्याने आणि ऐतिहासिक नेत्यांची भाषणे ध्वनिमुद्रित झालेली आहेत.
iii) रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले 'जन गण मन' हे आपले आजचे राष्ट्रगीत,सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांची भाषणे यांच्या ध्वनिफिती इतिहासाच्या अभ्यासकाना उपयुक्त असतात. आकाशवाणीवरून या ध्वनिफिती ऐकवल्या जातात.
(iv) या श्राव्य साधनांमधून इतिहासाच्या अभ्यासकांना तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि शैक्षणिक इतिहासाची माहिती मिळू शकते.
४. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.
%20(2).png)

0 Comments