युरोप आणि भारत इतिहास। इयत्ता आठवी । Europe Ani Bharat
NMMS EXAM
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षा या भागात इतिहास नागरिकशास्त्र या विषयातील पाठ 2. युरोप आणि भारत (Europe Ani Bharat) या पाठाचे महत्वाचे प्रश्न , Online Test , Youtube MCQ Video पाठ , स्वाध्याय पाहणार आहोत.
याच पद्धतीने संपूर्ण सामाजिक शास्त्राची तयारी करून घेणार आहोत ते पण सोप्या पद्धतीने .
Online Test 👇👇
स्वाध्याय
१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर जिंकून घेतले.
(अ) व्हेनिस (ब) कॉन्स्टॅन्टिनोपल
(क) रोम (ड) पॅरिस
(२) औदयोगिक क्रांतीला प्रारंभ इंग्लंड मध्ये झाला.
(अ) इंग्लंड (ब) फ्रान्स
(क) इटली (ड) पोर्तुगाल
(३) इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न सिराज उद्दौला याने केला.
(अ) सिराज उद्दौला ब) मीर कासीम
(क) मीर जाफर ड) शाहआलम
२.पुढील संकल्पना स्पष्ट करा.
1) वसाहतवाद
i) एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय.
ii) आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच 'वसाहतवाद' होय.
iii) युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला.
(२) साम्राज्यवाद.
उत्तर :
i) विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करून वसाहत स्थापन करणे, म्हणजेच 'साम्राज्यवाद' होय.
(ii) आपल्या राज्याच्या भौगोलिक सीमेपली-कडील अन्य भूभागांवर सत्ता गाजवणे म्हणजेच 'साम्राज्यवाद' होय.
(iii) लष्करीद्ृष्ट्या बलवान असलेल्या युरोपीय राष्ट्रांच्या साम्राज्यवादी धोरणापुढे आशिया - आफ्रिकेतील राष्ट्रे टिकू न शकल्यामुळे ती राष्ट्रे गुलाम बनली.
(iv) औदयोगिक क्रांतीनंतर साम्राज्यवाद वाढीस लागला. विसाव्या शतकात त्याचा अंत झाला.
(३) प्रबोधनयुग.
उत्तर :
i) मध्ययुगाच्या उत्तरार्धात युरोप खंडात धर्मसुधारणा चळवळीने जोर धरला. भौगोलिक शोधांमुळे नवनवे प्रदेश ज्ञात झाले.
ii) या काळात घडून आलेल्या प्रबोधनामुळे युरोपात कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान, प्राचीन परंपरा यांचे पुनरुज्जीवन घडून आले.
(iii) प्रबोधनामुळे मानवतावादाला चालना मिळाली
(iv) नव्या कल्पनांना आणि सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. युरोपात या सर्व घटना इसवी सनाच्या १३ व्या ते १६ व्या शतकांत घडून आल्या. म्हणून या काळाला 'प्रबोधनयुग' असे म्हणतात.
(४) भांडवलशाही.
उत्तर :
i) ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खासगी मालकीची असतात,त्या अर्थव्यवस्थेस 'भांडवलशाही अर्थव्यवस्था' असे म्हणतात.
ii) या अर्थव्यवस्थेत भांडवल, श्रमिक आणि उदयोजक यांच्या परस्पर सहकार्याने वस्तूंचे उत्पादन मोठया प्रमाणात केले जाते.
iii) अधिकाधिक नफा मिळवणे, हे उत्पादन निर्मितीचे उद्दिष्ट असते.
iv) व्यापारवाढीमुळे युरोपीय देशांत मोठ्या प्रमाणात जमा झालेला धनसंचय व्यापार व उदयोगांमध्ये गुंतवला गेल्याने युरोपात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला.
3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौला याचा पराभव झाला.
उत्तर :
i) बंगालचा नवाब सिराज उद्दौला याने इंग्रजांची कोलकात्याची वखार काबीज केल्यामुळे इंग्रजां मध्ये असंतोष निर्माण झाला.
ii) नवाबाचा सेनापती मीर जाफर याला नवाबपदाचे आमिष दाखवून रॉबर्ट क्लाईव्हने त्याला आपल्या बाजूस वळवले.
iii) इसवी सन १७५७ मध्ये इंग्रजांनी नवाबावर चाल केली. दोन्ही सैन्यांची प्लासी येथे गाठ पडली.
iv) आधी ठरल्याप्रमाणे मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौला याचा प्लासीच्या लढाईत पराभव झाला.
(२) युरोपीय देशांना आशियाकडे जाणान्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले ..
उत्तर :
i) प्राचीन काळापासून युरोपचे पूर्वेकडील देशांशी व्यापारी संबंध होते.
ii) आशिया व युरोप याना जोडणारे खुष्कीचे व्यापारीमार्ग बायझन्टाइन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टॅन्टिनोपल या शहरातून जात असत.
iii) इसवी सन १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले.
iv) तुर्कांनी हे मार्ग रोखून धरल्यामुळे युरोपियनांचा पूर्वेकडील व्यापार खंडित झाला. यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले.
(३) युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.
उत्तर : i) नव्या सागरी मार्गांच्या शोधानंतर युरोप आणि आशिया खंडांतील देश यांच्यात नव्या जोमाने व्यापारास सुरुवात झाली.
ii) पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी पुढे येऊन व्यापारात भांडवल गुंतवणूक करू लागले.
iii) व्यापारासाठी लागणारे भांडवल एकत्रितपणे उभारून व्यापारी कंपन्यांचा उदय झाला.
iv) पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर असून त्यामुळे देशाची आर्थिक भरभराट होते आहे, हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येऊ लागले. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते या व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले.
४. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा.
%20(1).png)
.png)
0 Comments