1. इतिहासलेखन : पाश्चात्य परंपरा
नमस्ते विद्यार्थी मित्रांनो,
या भागात आपण इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा , इतिहास
प्रज्ञाशोध परीक्षा त्याचसोबत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा यांची पण तयारी करणार
आहोत.
1) सुरुवातीला प्रश्न व त्यांची बहुपर्यायी उत्तरे ही व्यवस्थित पाहून सोडवा.
2) त्यानंतर आपण सोडवलेली
उत्तरे चेक करण्यासाठी सर्वात खाली आम्ही Answer
Key देत आहोत
त्यानुसार आपण आपले उत्तरे चेक करून घ्या.
आपल्याला काही अडचण असेल
तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.
१) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ….. यास म्हणता येईल.
(अ) व्हॉल्टेअर (ब) रेने देकार्त
(क) लिओपोल्ड रांके (ड) कार्ल मार्क्स
२) 'ऑर्केलॉजी ऑफ नॉलेज' हा ग्रंथ .... याने लिहिला.
(अ) कार्ल मार्क्स (ब) मायकेल फुको
(क) लुसिऔं फेबर (ड) व्हॉल्टेअर
३) इतिहास संशोधनामध्ये करणे शक्य नसते.
(अ) प्रत्यक्ष निरीक्षण (ब) संदर्भ तपासणी
(क) तौलनिक विश्लेषण (ड) चिकित्सक संशोधन
४) रेने देकार्त याने....... हा ग्रंथ लिहिला.
(अ) दास कैपिटल (ब) डिसकोर्स ऑन द मेथड
(क) रिझन इन हिस्टरी (ड) ऑर्केलॉजी ऑफ नॉलेज
५) लिओपोल्ड रांके च्या इतिहासलेखनासंबंधीचे संकलन.....ग्रंथात
आहे.
(अ) द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी (ब) डिसकोर्स ऑन द मेथड
(क) रिझन इन हिस्टरी (ड) ऑर्कलॉजी ऑफ नॉलेज
६) कार्ल मार्क्सने..... ग्रंथ लिहिला.
(अ) रिझन इन हिस्टरी (ब) डिसकोर्स ऑन द मेथड
(क) दास कैपिटल (ड) ऑर्केलॉजी ऑफ नॉलेज
७) वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता
पडताळून पाहण्यासाठी ... पद्धती आणि
प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला
जातो.
(अ) कथन (ब) नाटयीकरण
(क) प्रायोगिक (ड) चर्चा
८) ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची
सुरुवात मेसोपेटोमियातील..... संस्कृतीत झाली.
(अ) हडप्पा (ब) सुमेर
(क) अरब (ड) चीन
९) हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने हिस्टरी हा शब्द
प्रथम... या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला.
(अ) रिझन इन हिस्टरी (ब) द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी
(क) द थीअरी अँड प्रैक्टिस ऑफ हिस्टरी (ड) द हिस्टरिज
१०) हिस्टरी हा शब्द ........भाषेतील आहे.
(अ) इंग्रजी (ब) जर्मन
(क) हिंदी (ड) ग्रीक
११) हेगेलने लिहिलेले ..........हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
(अ) डिसकोर्स ऑन द मेथड (ब) रिझन इन हिस्टरी
(क) द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी (ड) द हिस्टरिज
१२) ...... च्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी
तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते.
(अ) व्हॉल्टेअर (ब) रेने देकार्त
(क) लिओपोल्ड रांके (ड) हेगेल
१३) ...... याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी
असावी ते सांगितले.
(अ) व्हॉल्टेअर (ब) रेने देकार्त
(क) लिओपोल्ड रांके (ड) हेगेल
१४) मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही
सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर..... याने भर दिला.
(अ) व्हॉल्टेअर (ब) रेने देकार्त
(क) लिओपोल्ड रांके (ड) हेगेल
१५) अॅनल्स प्रणाली सुरु करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे
श्रेय ...... इतिहासकारांना जाते.
(अ) फ्रेंच (ब) जर्मन
(क) ब्रिटिश (ड) भारतीय
१६)..... या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका
सिद्ध केली.
(अ) ताराबाई शिंदे (ब) सीमा-द-बोव्हा
(क) पंडिता रमाबाई (ड) शर्मिला रेगे
१७)... या ग्रंथामध्ये मायकेल फुको याने इतिहासाची कालक्रमानुसार
अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले.
(अ) द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी (घ) डिसकोर्स ऑन द मेथड
(क) रिझन इन हिस्टरी (ड) ऑर्केलॉजी ऑफ नॉलेज
१८) इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या
संशोधकाला...... म्हटले जाते.
(अ) पुरातत्त्वज्ञ (ब) भाषाशास्त्रज्ञ
(क) इतिहासकार (ड) समाजशास्त्रज्ञ
१९) ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची
सुरुवात मेसोपेटोमियातील.... सुमेर संस्कृतीमध्ये झाली
(अ) हडप्पा (ब) अरब
(क) सुमेर (ड) इजिप्शियन
२०) आधुनिक इतिहासलेखनाच्या परंपरेची बीजे .....प्राचीन
इतिहासकारांच्या लेखनात आढळतात.
(अ) भारतीय (ब) रोमन
(क) फ्रेंच (ड) ग्रीक
२१) हिस्टरी हा शब्द प्रथम....या ग्रीक इतिहासकाराने
त्याच्या द हिस्टरिज ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला.
(अ) व्हॉल्टेअर (ब) रेने देकार्त
(क) लिओपोल्ड रांके (ड) हिरोडोटस
२२) इ.स. १७३७ मध्ये जर्मनीमधील .....विदयापीठात प्रथमच
इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले.
(अ) केंब्रिज (ब) गॉटिंगेन
(क) ऑक्सफर्ड (ड) स्टॅनफर्ड
२३) एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर
प्रामुख्याने ..... यांच्या विचारांचा प्रभाव होता.
(अ) व्हॉल्टेअर (ब) रेने देकार्त
(क) लिओपोल्ड रांके (ड) कार्ल मार्क्स
२४) विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये..... नावाने
ओळखली जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयाला आली.
(अ) अॅनल्स (ब) मार्क्सवादी
(क) सबऑल्टर्न (ड) प्राच्य
२५) १९९० नंतर हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास
लिहिण्यावर भर दिला गेला.
(अ) स्त्री (ब) पुरुष
(क) कामगार (ड) शेतकरी
२६) ...... याने मनोविकृती, वैदयकशास्त्र, तुरुंगव्यवस्था
या विषयांचा इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला.
(अ) व्हॉल्टेअर (ब) रेने देकार्त
(क) लिओपोल्ड रांके (ड) मायकेल फुको
२७)...... च्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची
वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते.
(अ) व्हॉल्टेअर (ब) रेने देकार्त
(क) हेगेल (ड) मायकेल फुको
२८) ..... संशोधनात प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते.
(अ) विज्ञान (ब) गणित
(क) इतिहास (ड) भूगोल
२९) इतिहासलेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची
विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असा आग्रह ..... याने
धरला.
(अ) व्हॉल्टेअर (ब) रेने देकार्त
(क) हेगेल (ड) मायकेल फुको
३०) एखादी गोष्ट सत्य आहे असे निःसंशयरित्या प्रस्थापित होत
नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करु नये असा नियम .....याने सांगितला.
(अ) व्हॉल्टेअर (ब) रेने देकार्त
(क) हेगेल (ड) मायकेल फुको
३१) ......च्या विचारामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी
जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा पुढे आला.
(अ) व्हॉल्टेअर (ब) रेने देकार्त
(क) हेगेल (ड) मायकेल फुको
पाठासंदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
उत्तरे (Answer Key)👇👇👇
१) व्हॉल्टेअर २) मायकेल फुको ३) प्रत्यक्ष निरीक्षण
४) डिसकोर्स ऑन द मेथड ५) द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी
६) दास कैपिटल ७) प्रायोगिक ८) सुमेर ९) द हिस्टरीज
१०) ग्रीक ११) रिझन इन हिस्टरी १२) हेगेल
१३) लिओपॉल्ड रांके १४) लिओपॉल्ड रांके १५) फ्रेंच
१६) सीमा-द-बोव्हां १७) ऑर्केलॉजी ऑफ नॉलेज १८) इतिहासकार
१९) सुमेर २०) ग्रीक २१) हिरोडोटस २२) गॉटिंगेन
२३) लिओपोल्ड राँके २४) अॅनल्स २५) स्त्री
२६) मायकेल फुको २७) हेगेल २८) इतिहास
२९) रेने देकार्त ३०) रेने देकार्त ३१) व्हॉल्टेअर
इतिहास राज्यशास्त्र ,भूगोल सह सर्व विषयाची परिपूर्ण तयारी साठी वेब साइट Follow करा व Share करा.
%20(1).png)
0 Comments