Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

6.भूमी उपयोजन स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता आठवी | bhumi upyojan swadhyay | NMMS EXAM 2024 | Online Test | Muttepawar Sir

 NMMS / MTSE / भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा 

6.भूमी उपयोजन

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा  (NMMS) व
 भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा 
या पाठाचे  महत्वाचे  MCQ प्रश्न  , 
Online Test ,
Youtube  MCQ Video पाठ ,
 स्वाध्याय पाहणार आहोत.

6.भूमी उपयोजन स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता आठवी | sagri pravah | NMMS EXAM 2024 | Online Test | Muttepawar Sir


      👉 Youtube MCQ Video  

👉 स्वाध्याय साठी येथे क्लिक करा   

प्रश्न १ पुढील विधाने तपासा. अयोग्य विधाने दुरुस्त करा .

१) खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही.

   उत्तर : अयोग्य.

दुरुस्त विधान : खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे.

२) केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात.

उत्तर : अयोग्य.

दुरुस्त विधान : केंद्रीय व्यवहार विभागात दुकाने, बँका, कार्यालये असतात.

३)  नागरी वस्तीत सर्वांत जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते.

उत्तर : योग्य.

(४) ग्रामसेवक सातबाराचा (७/१२) उतारा देतो.

उत्तर : अयोग्य.

दुरुस्त विधान : तलाठी सातबाराचा (७/१२) उतारा देतो.

५) ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्रात जास्त जमीन असते.

उत्तर : अयोग्य.

दुरुस्त विधान : ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्रात  कमी जमीन असते.

६) उतारा क्रमांक ७ हे अधिकार पत्र आहे.

उत्तर : योग्य.

७) उतारा क्रमांक १२ हे फेरफार पत्रक आहे.

उत्तर : अयोग्य.

दुरुस्त विधान : उतारा क्रमांक १२ हे पीक पाहणी पत्रक आहे.

प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा.

१)  नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते.

i) लोकसंख्येच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत विविध सुविधा पुरवल्या जातात.

ii) या सेवा पुरवण्यासाठी वापरण्यात आलेली शहरांतील जमीन / क्षेत्र, म्हणजे 'सार्वजनिक सेवांचे क्षेत्र' होय.

iii)  टपाल कार्यालये, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शासकीय शाळा, शासकीय महाविद्यालये, शासकीय विदयापीठे, शासकीय रुग्णालये इत्यादी सुविधा पुरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रात समावेश होतो. सार्वजनिक सुविधा क्षेत्राद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांमुळे सामाजिक कल्याणात भर पडते.अशा प्रकारे, नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते.

(२) शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंद ही केली जाते.

i) शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेद्वारे केली जाते.

ii)  मिळकत पत्रिका प्रत्यक्षपणे संबंधित जमिनीवरील मालकी हक्क दर्शवते. शासकीय नगरभूमापन विभागाद्वारे मिळकत पत्रिका दिली जाते.

iii) मिळकत पत्रिकेद्वारे सिटी सर्व्हे क्रमांक, प्लॉट   क्रमांक, संबंधित बिगर शेतजमिनीवरील मालकी हक्क, संबंधित जमिनीचे क्षेत्रफळ, कराची रक्कम, वहिवाटीचे हक्क इत्यादींविषयीची माहिती मिळते. अशा प्रकारे, शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेचीही नोंद केली जाते.

३) भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते.

i) एखादया देशात शेतजमीन,माळरान इत्यादी प्रकारातील भूमी उपयोजन अधिक प्रमाणात असेल, तर अशा देशाचा  विकसनशील देशात समावेश होतो.

ii) एखादया देशात औदयोगिक क्षेत्र,सार्वजनिक सेवांचे क्षेत्र,मनोरंजन सेवांचे क्षेत्र इत्यादी भूमी उपयोजन अधिक प्रमाणात असेल, तर अशा देशाचा विकसित देशात समावेश होतो. अशा प्रकारे, भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते.

 प्रश्न 3 उत्तरे लिहा

(१) ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते ?

i)  भारतातील ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.

ii) शेती देशातील लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करते, तसेच इतर उद्योगांना कच्चा माल पुरवते.

iii) ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतीसाठी उपयोजन केले जाते. म्हणून,ग्रामीण भूमी उपयोजनात शेती महत्त्वाची असते.

(२) भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा.

(अ) ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक :

i) ग्रामीण भूमी उपयोजनावर हवामान, मृदा, जमिनीच्या उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्ती, सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात.

ii) उदा., तीव्र उताराच्या जमिनीचे निवासासाठी उपयोजन केले जात नाही, अशा जमिनीचे पायऱ्यांच्या शेतीसाठी उपयोजन केले जाते.

(ब) नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक :

i) नागरी भूमी उपयोजनावर भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक  साधनसंपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिकीकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा, सरकारी धोरण इत्यादी

ii) उदा., सर्वसाधारणपणे रेल्वे स्थानक, बाजारपेठा यांपासून जवळचे स्थान असणाऱ्या भूक्षेत्राचे सेवा क्षेत्रातील उद्योगांसाठी जास्तीत जास्त उपयोजन केले जाते.

(३) ग्रामीण भूमी उपयोजनातील    नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करा.

ग्रामीण भूमी उपयोजन

i) ग्रामीण भागातील भूमीचे तुलनेने मर्यादित कारणांसाठी पुढीलप्रमाणे उपयोजन केले जाते.

ii) ग्रामीण भागातील भूमी उपयोजनाचा आकृतिबंध तुलनेने साधा असतो.

iii. ग्रामीण भूमी उपयोजनात शेती क्षेत्र सर्वांत महत्त्वपूर्ण असते.

नागरी भूमी उपयोजन

i) नागरी भागातील भूमीचे अनेक कारणांसाठी उपयोजन केले जाते.

ii)नागरी भूमी उपयोजनाचा आकृतिबंध तुलनेने जटील असतो.

iii. नागरी भूमी उपयोजनात निवास क्षेत्र व व्यावसायिक क्षेत्र महत्त्वपूर्ण असते.

(४) सातबारा उतारा  आणि मिळकत पत्रिका यातील फरक स्पष्ट करा.

सातबारा उतारा

i) सातबारा उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागामार्फत दिला जातो.

ii) सातबारा उतारा अप्रत्यक्षपणे जमिनीवरील मालकी हक्क दर्शवतो.

मिळकत पत्रिका

i) मिळकत पत्रिका शासकीय नगर भूमापन विभागामार्फत दिली जाते.

ii) मिळकत पत्रिका प्रत्यक्षपणे जमिनीवरील मालकी हक्क दर्शवते.

NMMS EXAM ची परिपूर्ण तयारी साठी FALLOW बटन किल्क करून ठेवा .

येथे किल्क करा 👇👇👇 

MUTTEPAWAR SIR  youtube channel

ONLINE TEST 👇👇
1/10
ग्रामीण भागात लोकसंख्या विरळ का असते ?
शेतीक्षेत्रालगत असल्यामुळे
सुपीक जमिनीमुळे
खनिजयुक्त जमिनीमुळे
जमिनीची उपलब्धत जास्त व लोकसंख्या कमी
2/10
खनिजयुक्त जमिनीत कोणता व्यवसाय केला जातो ?
खाणकाम
शेती
पशुपालन
मासेमारी
3/10
कोणत्या जमिनीच्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते ?
गायरान शेतजमीन
बिगर शेतजमीन
जिरायत शेतजमीन
बागायत शेतजमीन
4/10
जमीन व महसूलच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावचे नमुने कोणाकडे असतात ?
तलाठी
सरपंच
उपसरपंच
ग्रामसेवक
5/10
गावचा नमूना नं. 7 आणि गावचा नमूना नं 12 मिळून कोणता उतारा तयार होतो ?
फेरफार
आठ अ
सातबारा
यापैकी कोणतेही नाही
6/10
एक ते दोन हंगाम शेत जमिनीची काही भाग शेतकरी वापरत नाहीत त्याला काय म्हणतात ?
चालू पड
जिराईत
पडकी
बागायत
7/10
झुरिच हे ......... देशातील नियोजित शहराचे उदाहरण आहे.
भारत
दक्षिण कोरिया
ब्राझील
स्वित्झर्लंड
8/10
हिंगणा तालुका कोणत्या जिल्ह्यात येते.
भंडारा
यवतमाळ
चंद्रपूर
नागपूर
9/10
अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील नियोजित शहराचे उदाहरण आहे.
वॉशिंग्टन डी.सी
सिंगापूर
ब्राझीलिया
भुवनेश्वर
10/10
शेत जमीन जिचा शेतीसाठी वापर थांबवला आहे ती जमीन कशी असते ?
गायरान
पडीक
जिराईत
बागाईत
Result:

Post a Comment

0 Comments