Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

9. स्वातंत्र्यलढयाचे अंतिम पर्व स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास व नागरिकशास्त्र | NMMS EXAM 2024 | Online Test | Muttepawar Sir

9. स्वातंत्र्यलढयाचे अंतिम पर्व

swatantrya ladhyache antim parv

Youtube  MCQ Video पाठ , 

स्वाध्याय संपूर्ण उत्तरासह  

Online Test , 

पाहणार आहोत.


9. स्वातंत्र्यलढयाचे अंतिम पर्व स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास व नागरिकशास्त्र | NMMS EXAM 2024  | Online Test | Muttepawar Sir




१.दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

( अंदमान व निकोबार, ऑगस्ट क्रांती, विनोबा भावे )

१) वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते.

२) १९४२ च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असे म्हटले जाते.

३) नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.

2 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

१) नोव्हेंबर १९३९ मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले.

उत्तर : i) १ सप्टेंबर १९३९ साली सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धात भारत इंग्लंडच्या बाजूने सहभागी होत असल्याची घोषणा व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी केली.

ii) आपण युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला.

iii) हा दावा खरा असेल, तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य दयावे, अशी मागणी राष्ट्रीय सभेने सरकारकडे केली.

iv) ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने, नोव्हेंबर १९३९ मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले.

(२) आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली.

उत्तर : i) सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना प्रतिकूल परिस्थितीतही इंग्रजांशी लढत होती

ii) परंतु, आझाद हिंद सेनेला मिळणारी जपानची लष्करी मदत बंद झाल्याने इम्फाळची मोहीम अर्धवट सोडावी लागली.

iii) याच काळात जपानने शरणागती पत्करल्यामुळे आझाद हिंद सेनेचा आधारच संपला होता.

iv) १८ ऑगस्ट १९४५ रोजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात निधन झाल्याने आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली.

(३) प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले.

उत्तर : 'चले जाव' चळवळीच्या काळात भारतात अनेक  भागांत प्रतिसरकारे स्थापन झाली.

i) या सरकारांनी कायदा सुव्यवस्था टिकवण्याचे आणि गुन्हेगारांना शासन करण्याचे काम चोखपणे केले.

ii) सावकारशाहीला विरोध केला.

iii) साक्षरता प्रसाराचे काम केले.

iv) दारूबंदी, जातिभेद निर्मूलन अशी समाजसेवेची कामे केली. या विधायक कामांमुळे प्रतिसरकारे जनतेची प्रेरणास्थाने ठरली.

3. पुढील तक्ता पूर्ण करा.

संघटना                                    संस्थापक

फॉरवर्ड ब्लॉक                         सुभाषचंद्र बोस

इंडियन इंडिपेंडन्स लीग         रासबिहारी बोस

तुफान सेना                           जी.डी. उर्फ बापू लाड

४. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1. शिरीषकुमारचे कार्य तुम्हांस कसे प्रेरणादायी आहे ?

उत्तर : i) शिरीषकुमार आणि त्याच्या  सहकार्यांनी तिरंगी   झेंडा घेऊन मिरवणूक काढली. 'वंदे मातरम्'च्या घोषणा दिल्या. गोळीबारात शिरीषकुमार हुतात्मे झाले.

ii) त्याचे हे कार्य आपल्याला प्रेरणादायी ठरले. देशासाठी, आपल्या समाजासाठी आपण काहीतरी काम केले पाहिजे ही प्रेरणा त्याच्या कार्यातून मिळते.

iii) आज स्वातंत्र्य मिळवणे हे ध्येय राहिले नाही, परंतु आपला परिसर चांगला ठेवावा, परिसरातील लोकांमध्ये एकी निर्माण करावी, त्यांच्या समस्या सामुदायिकपणे दूर कराव्यात यासाठी प्रेरणा मिळते.

iv) अन्यायाला, जुलमाला बळी जाता अशा प्रवृत्तींविरुद्ध लढण्याची प्रेरणा शिरीषकुमार यांच्या कार्यातून मिळते.

v) त्याग, सहकार्य, कामावर निष्ठा, निश्चयीपणा यांबाबतही त्यांच्याकडून प्रेरणा मिळते.

(२) इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले ?

उत्तर : i) दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानविरुद्ध लढणाऱ्या अमेरिकेच्या बाजूने भाग घेतला.

ii) भारतावर इंग्लंडचे राज्य असल्याने जपान भारतावर आक्रमण करण्याची शक्यता होती.

iii) जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन थडकल्या.

iv) जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले. म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना एक योजना घेऊन भारतात पाठवले.

(३) राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली ?

 उत्तर : ८ ऑगस्ट १९४२ रोजी राष्ट्रीय सभेने 'छोडो भारत'चा ठराव संमत केल्यावर त्याच रात्री राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाली. हे वृत्त देशभर पसरल्यावर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या –

i) संतप्त जनतेने ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या.

ii) पोलिसांनी जनतेवर लाठीहल्ला, गोळीबार करूनही जनता घाबरली नाही.

iii) आंदोलकांनी तुरुंग, पोलीस ठाणी, रेल्वे स्थानके यांच्यावर हल्ले केले सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले.

iv) शाळकरी विदयार्थ्यांनीही मिरवणुका काढून 'वंदे मातरम्  च्या घोषणा दिल्या.


NMMS EXAM ची परिपूर्ण तयारी साठी FALLOW बटन किल्क करून ठेवा .

येथे किल्क करा 👇👇👇 


NMMS

ONLINE TEST 👇👇


1/10
१९४२ च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला काय म्हटले जाते ?
जून क्रांती
लाल क्रांती
ऑगस्ट क्रांती
ऑक्टोबर क्रांती
2/10
मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी कोणत्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी संप पुकारला.
कराची
दिल्ली
मेरठ
वरील सर्व
3/10
सुभाषचंद्र बोस यांचे निधन केव्हा झाले ?
५ ऑगस्ट १९४५
१८ ऑगस्ट १९४५
१८ ऑगस्ट १९४४
९ ऑगस्ट १९४५
4/10
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणते आव्हान केले ?
'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा'
'उठा , जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका
'वेदांकडे परत चला'
छोडो भारत
5/10
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?
जयप्रकाश नारायण
डॉ.राममनोहर लोहिया
महात्मा गांधी
आचार्य विनोबा भावे
6/10
क्रांति अग्रणी जी.डी. ऊर्फ बापू लाड यांनी कोठे 'तुफान सेनेची स्थापना केली ?
चिरनेर
नागपूर
कुंडल
यावली
7/10
नागपुरच्या जनरल आवारी यांनी कोणता गट स्थापन केला ?
लाल सेना
आझाद दस्ता
स्वतंत्र सेना
तुफान सेना
8/10
नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी ... च्या नेतृत्वाखाली तिरंगा घेऊन मिरवणूक काढली ?
राजेंद्र कुमार
विजय कुमार
शिरीष कुमार
अरुण कुमार
9/10
८ ऑगस्ट रोजी कोणी मांडलेला छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला ?
महात्मा गांधी
पंडित नेहरू
आचार्य विनोबा भावे
मौलाना आझाद
10/10
युरोपात दुसरे महायुद्ध केव्हा सुरू झाले ?
1945
1938
1939
1943
Result:

Post a Comment

0 Comments