Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 । सुधारित वेळापत्रक | 11th admission link 2025 - https://mahafyjcadmissions.in/

 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 

सुधारित वेळापत्रक

11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26  सुधारित वेळापत्रक

फेरी क्र. १-  तपशीलवार सुधारित वेळापत्रक


1) २६ मे २०२५ सकाळी ११:०० वा. ते ०३ जुन २०२५  सायंकाळी ६:०० वा.
१. प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी व प्राधान्यक्रम निश्चितीसह प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू
२. विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान १ ते कमाल १० उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात.
३. अर्जात दिलेल्या पसंती क्रमानुसार आरक्षण, गुण याच्या आधारे प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालयाचे वाटप केले जाईल.
४. एकाच वेळी विद्यार्थी कोटा अंतर्गत प्रवेशासाठी देखील अर्ज करु शकेल (व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत प्रवेश कोटा व अल्पसंख्याक कोटा यासाठी शून्य फेरी).
५. प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्याने संमती नोंदवणे आवश्यक आहे.
६. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
२)  ०५ जुन २०२५
तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे.
3) ०६ जुन २०२५ ते  ०७ जुन २०२५
१. तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत विद्यार्थी त्यांच्या Login मधून Grievance Redressal द्वारे हरकती दाखल करू शकतात.
२. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सदर हरकतींचे ऑनलाईन निराकरण.
३. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सदर हरकतीबाबत अंतिम निर्णय.
४) ०८ जुन २०२५
• अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध (एकदाच होणारी प्रक्रिया)
• शून्य फेरी-व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा, अल्पसंख्याक कोटा यासाठी शून्य फेरी अंतर्गत विद्यार्थी / उच्च माध्यमिक शाळा निवड व वाटप.
५) ०९ जुन २०२५ ते  ११ जुन २०२५
शून्य फेरी प्रवेश
१. व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा, अल्पसंख्याक कोटा याअंतर्गत विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर Proceed for Admission वर क्लिक करावे.
२. विद्यार्थ्याने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून, विहित शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे.
६)  ०९ जुन २०२५
कॅप फेरी प्रवेश
• गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड /वाटप प्रक्रिया,
• विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड /वाटप प्रक्रियेचे विभागीय समितीद्वारे परीक्षण.
7) १० जुन २०२५
कॅप फेरी प्रवेश
१. प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय निहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर
२. विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय वाटप तपशील उपलब्ध होईल.
३. उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांचे वाटप यादी प्राप्त होईल
४. फेरीनिहाय कट ऑफ-तपशिलाची प्रसिध्दी वेब पोर्टलवर प्रसिध्द केले जाईल.
८) ११ जुन २०२५ ते  १८ जुन २०२५
१. विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर Proceed for Admission वर क्लिक करावे.
२. विद्यार्थ्याने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून, विहित शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे.
३. विद्यार्थ्यास मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश नको असल्यास, पुढील फेरीसाठी संमती देऊन सहभागी होता येईल.
४. प्रवेशाची निश्चिती, प्रवेशास नकार व प्रवेश रद्दची नोंद उच्च माध्यमिक शाळेच्या लॉगिनद्वारे केली जाईल.
५. नवीन विद्यार्थ्यांसाठी पुढील फेरीतील समावेशासाठी नोंदणी व पसंतीक्रम भरणे हे विद्यार्थ्याने संमती दिल्याच्या अटीवर सुरू राहील.
सूचना :
i)  जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, तर विद्यार्थी लॉगिन मधून Proceed for Admission वर क्लिक करावे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि त्यानंतर वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन विहित पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
ii) जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल, तर तो पुढील फेरीची वाट पाहू शकतो. परंतु:
iii)  ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय प्राप्त झाले आहे, त्यांनी संबंधित विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
iv) अशा विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला नाही किंवा त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला, तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेरी (Round २ ते ४) साठी अपात्र ठरवले जाईल आणि त्यांना फक्त सर्वांसाठी खुली फेरी (Open for All Round) साठीच विचारात घेतले जाईल.
v) जर एखाद्या विद्यार्थ्याला आपला निश्चित झालेला प्रवेश रद्द करायचा असेल, तर त्याने संबंधित उच्च माध्यमिक हा विद्यालयाकडे विनंती करावी व प्रवेश रद्द करून घ्यावा.
vi) अशा विद्यार्थ्यांना देखील त्या नंतरच्या नियमित फेरीसाठी अपात्र ठरवले जाईल, व ते पुढील फेरीनंतरच प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेतले जातील.
९) २० जुन २०२५
फेरी क्रमांक २ साठी रिक्त जागांची यादी जाहीर  करणे (कोटा जागांसह) 

महत्त्वाच्या सूचना:
१. ज्यांनी कोटा किंवा कॅप अंतर्गत संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केला आहे, त्यांच्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण समजली जाईल.
२. विद्यार्थी नोंदणी शुल्क केवळ डिजिटल पद्धतीनेच स्वीकारले जाईल.
३. सर्व संबंधितांनी दिलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे.
४. शून्य फेरी - व्यवस्थापन, इनहाऊस-, आणि अल्पसंख्याक कोट्यांतील प्रवेश दि. ०९ जुन २०२५ ते दि. ११ जुन २०२५ होतील.





Post a Comment

0 Comments