Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

10 वी पास विद्यार्थ्यांसाठी फ्री टॅबलेट योजना | mahajyoti tab registration 2025 | mahajyoti registration 2025 online

10 वी पास विद्यार्थ्यांसाठी फ्री टॅबलेट योजना 

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती- विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील
विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE/NEET/MHT-CET Batch- 2025-27 च्या पूर्वतयारीसाठी मोफत
ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल.

१० वी पास विद्यार्थ्यांसाठी फ्री टॅबलेट योजना |  mahajyoti tab registration 2025 |

अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता :-

1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी.

2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती - भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील

असावा/असावी तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/असावी.

3. सन-2025 मध्ये इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता

पात्र राहतील.

4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ

दिसतील असे, जोडणे आवश्यक आहे.

5. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग

व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.


ब. अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे :-


1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)

2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)

3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)

4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Valid Non-Creamy Layer Certificate)

5.इयत्ता 10 वी ची गुणपत्रिका

6.इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व प्रवेश पावती

7.दिव्यांग असल्यास दाखला

8. अनाथ असल्यास दाखला


समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-

1) प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.

2) दिव्यांगाकरीता 4% जागा आरक्षित आहे.

3) अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.


ड. अर्ज कसा करावा :-

1. महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील "Application for JEE/NEET/MHT-CET-Batch-2025-27 Training" यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

2. अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.

अटी व शर्ती :-

1. अर्ज करण्याची अंतिम दि.31/05/2025 आहे.

2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

4. कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.

5.अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर

संर्पक करावा: संपर्क क्र - 0712-2870120/21



Post a Comment

0 Comments