इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025 -2026
शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेड ,
जिल्हा व तालुकास्तरीय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र
प्रति,
गट शिक्षणाधिकारी..सर्व
तालुका प्रमुख सर्व
तालुका तांत्रिक सहाय्यक..सर्व
तसेच
*प्राचार्य व मुख्याध्यापक, उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालय संलग्न जिल्हा नांदेड
आज सकाळी 10 वा पासून इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी सुरुवात होत असून सर्व माध्यमिक विद्यालय स्तरावर तसेच कॉलेज स्तरावर विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे, याची आपन सर्व विद्यार्थी व् पालक यांनी यापूर्वीच माहिती दिलेली आहे
सदर बाब सबंधित गटशिक्षणाधिकारी व् तालुका प्रमुख यांनी पडताळून घ्यावी.तसेच तालुक्यातील सर्व प्राचार्य मुख्याध्यापक यांना सम्पर्क करुण खात्री करुण घ्यावी सदर प्रवेश प्रक्रिये बाबत योग्य ती प्रसिद्धि व् नियोजन केल्याची खात्री करावी
तसेच तालुका स्तरावर गट शिक्षणाधिकारी कार्यालयात नोंदणी बाबत नियोजन करावे व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयात सुद्धा नोंदणी बाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचे कळवावे
विद्यार्थी व् पालक यांना नोंदणी करताना काही तांत्रिक अड़चन येत असल्यास तालुका स्तरावरील सहायता केंद्राने त्याबाबत अगोदर प्रयत्न करावा याखेरीज काही अडचणी असतीलतर जिल्हा स्तरावरील सहायता कक्षाशी सम्पर्क करावा जिल्हा स्तरावरील सम्पर्क कक्षात खालील प्रमाणे सहायता करण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे
शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय जिल्हा परिषद नांदेड
श्री पोकले हनुमंत सर 9422896635 , 8624003268
श्री क़ाज़ी सर 9423920125
श्री सिद्धार्थ पवळे सर 8087314886
श्री संभाजी अलाबदे सर 9766531010
ज्या अडचणी जिल्हा स्तरावर सूटत नसतील त्यासाठीच विभाग स्तरावरील कंपनी कडून नियुक्त करण्यात आलेले तांत्रिक सहाय्यक श्री कुलदीप धर्माधिकारी ( 7218393979) यांचेशी संपर्क साधावा.
आपल्या स्तरावर नोंदणीसाठी मदत करण्यात आलेल्या व मार्गदर्शनासाठी आलेल्या विद्यार्थी/ पालक यांची दिनांक निहाय नोंद वेगळ्या रजिष्टर मध्ये ठेवण्यात यावी.
तसेच विशेष महत्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ऑफ़लाइन प्रवेश होणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्यावे असे आढळून आल्यास त्वरित जिल्हा कार्यालयास याबाबत लेखी अवगत करावे व स्थानिक पातळीवर सदर कॉलेज ची प्रसिद्धि द्यावी जेनेकरुण त्याठिकाणी ऑफ़लाइन प्रवेश होणार नाहीत याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
प्रसार व प्रचार माध्यमांना आपल्या कार्य क्षेत्रातील आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.अपुरी व चुकीची माहिती देऊ नए. एखादी माहिती नसल्यास जिल्हा कार्यालयशी सम्पर्क करावा
आजपासून सुरू होणाऱ्या इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश नोंदणीसाठी सर्व अधिकारी/ विद्यार्थी व पालक यांना मनपूर्वक शुभेच्छा !
शिक्षणाधिकारी माध्यमिक
जिल्हा परिषद नांदेड
.jpg)
0 Comments