Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 । पहिली फेरी वेळापत्रक | 11th admission link 2025 - https://mahafyjcadmissions.in/

11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 । पहिली फेरी वेळापत्रक | 11th admission link 2025 - https://mahafyjcadmissions.in/

इयत्ता ११ वी केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ - फेरी क्र. १ साठी वेळापत्रक व प्रवेश क्षमतेबाबत

महत्त्वाची माहिती

11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 । पहिली फेरी वेळापत्रक | 11th admission link 2025 - https://mahafyjcadmissions.in/

फेरी क्र. १- तपशीलवार वेळापत्रक

दिनांक १९ मे सकाळी ११:०० ते  २० मे २०२५ सायं. ६:००

विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र (Practice Session)

टीप : हे सत्र केवळ सरावासाठी असून, यामध्ये भरलेली माहिती २० मे रोजी मध्यरात्री पोर्टलवरून हटवण्यात येईल


२१ मे सकाळी ११:००  ते  २८ मे २०२५ सायं. ६:००

प्रत्यक्ष नोंदणी व पसंतीक्रम नोंदविणे

- १ ते १० पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती

- कोटा (व्यवस्थापन, इन-हाऊस, अल्पसंख्याक) साठी अर्ज

- प्रत्येक फेरीपूर्वी "Consent" आवश्यक

३० मे २०२५ सकाळी ११:००

तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर

३० मे ते १ जून २०२५  सायं. ४:०० पर्यंत

हरकती व दुरुस्ती प्रक्रिया (Login द्वारे)

३ जून २०२५ सायं. ४:००

अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

५ जून २०२५ 

गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप (शून्य फेरी)

६ जून २०२५ सकाळी १०:००

वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर

६ ते १२ जून २०२५ सकाळी ११:०० ते सायं. ६:००

"Proceed for Admission" निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे

- आवश्यक कागदपत्रे अपलोड व प्रत्यक्ष तपासणी

- पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य

१४ जून २०२५  रात्री १०:००

दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर

राज्याची एकूण प्रवेश क्षमता: २०,४३,२५४
विज्ञान: ८,५२,२०६
वाणिज्य: ५,४०,३१२
कला: ६,५०,६८२

महत्त्वाच्या सूचना:
जे विद्यार्थी CAP किंवा कोटामार्फत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करतात, त्यांची प्रवेश प्रक्रिया
पूर्ण झालेली समजली जाईल.एकदा उमेदवाराने संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास, त्याचा प्रवेश निश्चित
मानण्यात येईल.
नोंदणी शुल्क डिजिटल माध्यमातूनच स्वीकारला जाईल.
सर्व संबंधितांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
व्यवस्थापन / इन-हाऊस / अल्पसंख्याक कोट्यांतील प्रवेश ६ जून २०२५ पासून सुरू होतील.

अधिक माहितीसाठी संपर्क:

वेबसाईट: www.mahafyjcadmissions.in

ई-मेल: support@mahafyjcadmissions.in



प्रसिद्धीसाठी अधिकृत:

डॉ. महेश पालकर

संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

Post a Comment

0 Comments