1.संसदीय शासन पद्धतीची ओळख
NMMS EXAM
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षा या भागात इयत्ता आठवी , नागरिकशास्त्र १. संसदीय शासन पद्धतीची ओळख स्वाध्याय | Sansadiya Shasan Paddhati chi Olakh Swadhyay या पाठाचे महत्वाचे प्रश्न , Online Test , YouTube MCQ Video पाठ , स्वाध्याय पाहणार आहोत.
याच पद्धतीने संपूर्ण सामाजिक शास्त्राची तयारी करून घेणार आहोत ते पण सोप्या पद्धतीने.
👉👉 YouTube MCQ Video 👈👈
बहूपर्यायी Online Test 👇👇
स्वाध्याय
१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) संसदीय शासन पद्धती इंग्लंड येथे विकसित झाली.
(अ) इंग्लंड (ब) फ्रान्स
(क) अमेरिका (ड) नेपाळ
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला.
i) संसदीय शासनपद्धती प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली.
ii) इंग्लंडची भारतावर सुमारे १५० वर्षे सत्ता होती. या काळात इंग्रजांनी संसदीय शासनपद्धतीनेच राज्यकारभार चालवला.
iii) भारतीयांना या काळात या पद्धतीच्या राज्यकारभाराची चांगली ओळख झाली होती.
iv) संविधान सभेतही राज्यकारभाराच्या पद्धतीबाबत पूर्ण चर्चा होऊन त्यावर निर्णय घेण्यात आला.
यामुळे भारतीय संविधानकर्त्यानी भारताला अनुकूल ठरेल.असा बदल करून संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला.
(२) संसदीय शासनपद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते.
i) संसदीय शासनपद्धतीत संसदेत चर्चा व विचारविनिमय करूनच निर्णय घेतले जातात.
ii) विरोधी पक्षही चर्चेत सहभागी होऊन शासनाच्या धोरणातील त्रुटी दाखवून देतो.
iii) सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर चर्चा व विचारविनिमय होऊनच कायदेनिर्मिती होते. एकतंत्रीय राजवटीत हे होत नसते.
iv) जनतेचे अहित होणारे वा स्वातंत्र्याला बाधित होणारे मुद्दे, धोरणे दूर करण्यासाठी चर्चा व विचारविनिमय होणे महत्त्वाचे असते.
४. खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) जबाबदार शासनपद्धती म्हणजे काय ?
i) ज्या शासनपद्धतीत कार्यकारी मंडळ आपल्या कामाबाबत कायदेमंडळाला जबाबदार असते त्या पद्धतीला 'जबाबदार शासनपद्धती' असे म्हणतात.
ii) या पद्धतीत कायदेमंडळाला विश्वासात घेऊनच मंत्रिमंडळाला राज्यकारभार करावा लागतो.
iii) प्रत्येक मंत्री आपल्या खात्याचे निर्णय घेत असला तरी तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो.
iv) प्रत्येक खात्याची धोरणे वा निर्णय ही संपूर्ण मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी मानली जाते. मंत्रिमंडळाच्या या सामूहिक जबाबदारीच्या पद्धतीलाच 'जबाबदार शासनपद्धती' असे म्हणतात.
(२) अध्यक्षीय शासनपद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
i) अध्यक्षीय शासनपद्धतीत राष्ट्राध्यक्षाची निवड थेट जनतेकडून होते.
ii) कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. तरीही त्यांच्यात परस्परांवर नियंत्रण असते.
iii) कायदयांच्या अंमलबजावणीचे अधिकार राष्ट्राध्यक्षाकडे असतात.
iv) कायदेमंडळाच्या पाठिंब्यावर राष्ट्राध्यक्ष अवलंबून नसतो.
५ . विरोधी पक्षांची भूमिका महत्वपूर्ण का असते? याबाबत तुमचे मत लिहा.
संसदीय व अध्यक्षीय अशा दोन्ही शासनपद्धती विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण असते.
i) विरोधी पक्ष संसदेत चालणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होऊन शासनाच्या धोरणातील, विधेयकांमधील त्रुटी दाखवून देतो.
ii) आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून विरोधी पक्ष कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवतात.
iii) विरोधी पक्षांच्या दबावामुळे मंत्रिमंडळ मनमानी कारभार करू शकत नाही.
iv) जागृत विरोधी पक्षांमुळे सदोष कायदे जनहिताकडे दुर्लक्ष, भ्रष्टाचार असे प्रकार राज्यकारभारात होत नाहीत. निर्दोष आणि सक्षम राज्यकारभारासाठी आणि लोकशाहीसाठी विरोधी पक्षांची भूमिका
महत्त्वपूर्ण असते.
👉 स्वाध्याय 👈
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ( इयत्ता ८ वी) 2024
.png)

0 Comments