समतेचा लढा स्वाध्याय इयत्ता आठवी
👉अत्यंत महत्वपूर्ण MCQ For NMMS / MTSE/इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा 👈
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
( लाला लजपतराय, साने गुरुजी, रखमाबाई जनार्दन सावे )
१) राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची स्थापना रखमाबाई जनार्दन सावे यांनी केली.
२) अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष साने गुरुजी हे होते.
३) आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय होते.
2. टिपा लिहा.
१) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य.
उत्तर : (i) दलितांना स्वाभिमानी आणि उद्योगी बनवणे हे विठ्ठल रामजी शिंदे यांचे ध्येय होते.
(ii) दलितांच्या प्रगतीसाठी त्यांनी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' ही संस्था सुरू केली.
(iii) उच्चवर्णीयांच्या मनातील दलितविषयक भ्रामक समजुती नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
(iv) मुंबईत परळ, देवनार या भागांत त्यांनी मराठी शाळा, उद्योगशाळा सुरू केल्या.
(v) पर्वती मंदिरामध्ये प्रवेशासाठी सत्याग्रह, शेतकी परिषद संयुक्त मतदारसंघ यात दलितांचा सहभाग व त्यांचे हित यासाठीही ते सक्रिय असत.
(२) राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा.
उत्तर : (i) मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.
(ii) जातिभेद निर्मूलनासाठी रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसाय बंदी हे जातींतील निर्बंध दूर केले.
(iii) आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली.
(iv) संस्थानातील 'बलुतेदारी पद्धती' नष्ट केली आणि लोकांना व्यवसाय स्वातंत्र्य देऊन त्यांची सामाजिक मुक्तता केली.
3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले.
उत्तर : (i) १९२५ साली स्थापन झालेल्या साम्यवादी पक्षाचा कामगार वर्गात प्रभाव वाढू लागला.
(ii) आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्त्वावर समाजाची फेररचना झाली पाहिजे,असे साम्यवादी नेत्यांचे मत होते.
(iii) कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढावू संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी या काळात केले.
(iv) साम्यवादी चळवळीचा वाढता प्रभाव सरकारला धोकादायक वाटू लागला, त्यामुळे सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले.
(२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली.
उत्तर : (i) स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांवर समाजाची उभारणी करण्याचे ध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाळगून होते.
(ii) सामाजिक समता आणि स्वाभिमानावर आधारलेली चळवळ त्यांना करायची होती.
(iii) त्यादृष्टीने समाजात जागृती घडवून आणणे आवश्यक होते.
(iv) दलितांच्या दुःखांना वाचा फोडायची होती. आपले हे विचार समाजापर्यंत पोहोचण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वृत्तपत्रे सुरू केली
(३) राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली
उत्तर : i) एकोणिसाव्या शतकात कापड गिरण्या, रेल्वे यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती. कामगारांची संख्या कमी होती.
ii) कामगारांच्या संघटना नसल्याने कामगार संघटित नव्हते.
iii) पहिल्या महायुद्धानंतर भारतात औदयोगिकीकरणाचे प्रमाण वाढले; त्यामुळे कामगार वर्गाची वाढ झाली.त्यातून राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली.
४. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्त्वाचा का ठरतो ?
उत्तर : स्वातंत्र्याच्या लढ्यामुळे लोकांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले, परंतु स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचा लढाही महत्त्वपूर्ण होता.
i) या लढ्यामुळे सरंजामशाहीला धक्का बसून शेतकऱ्यांना न्याय मिळू लागला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जाऊ लागले.
ii) कामगारांचे लढे तीव्र होऊन समाजवादी समाजरचनेची हा वर्ग मागणी करू लागला.
iii) स्त्रियांची दयनीय स्थिती सुधारण्यासाठी पुरुषांबरोबरच स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊन स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरला जाऊ लागला.
iv) दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडून अस्पृश्यता नष्ट करणे, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करणे यादृष्टीने प्रयत्न होऊ लागले. अशा रितीने समाजातील शोषित, पीडित समाजाच्या विकासासाठी समतेचे हे लढे महत्त्वाचे ठरले.
(२) पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा.
उत्तर : i) १९३८ साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पिके बुडाली.
ii) हलाखीची परिस्थिती झालेल्या शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी शेतकऱ्यांना संघटित केले.
iii) जागोजागी सभा-मिरवणुका घेऊन कलेक्टर कचेरीवर मोठ्या संख्येने मोर्चे काढले.
iv) धुळे-अमळनेर येथे गिरणी कामगारांचे संघटन करून किसान-कामगारांची एकजूट घडवून आणली.
(३) कामगारांनी उभे केलेले लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक कसे ठरले ?
उत्तर : (i) भारतात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उद्योगधंदे सुरू झाल्याने कामगारांचा मोठा वर्ग उदयाला आला. आपल्या समस्यांसाठी हा वर्ग लढे देऊ लागला. कामगारांच्या या लढ्याने स्वातंत्र्य चळवळीस पाठबळ मिळाले.
(ii) वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले.
(iii) १९२८ साली मुंबईत गिरणी कामगारांनी सहा महिने संप केला. रेल्वे कामगार, ताग कामगार, आसामातील चहामळे कामगार अशा अनेक ठिकाणच्या कामगारांनी तीव्र लढे दिले.
(iv) कामगार चळवळीच्या वाढत्या शक्तीने सरकारही अस्वस्थ झाले. अशा रितीने कामगारांचे हे लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक व उपयुक्त ठरले.
(४) स्त्रीविषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.
उत्तर : (i) भारतातील समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते. दुष्ट चालीरीतींमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे. विसाव्या शतकात स्त्रीविषयक सुधारणांसाठी समाजात जागृती होऊ लागली.
(ii) स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊन त्या स्वतंत्र संस्था आणि संघटना स्थापन करू लागल्या.
(iii) वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नांबाबत संघटनांच्या माध्यमांतून स्त्रिया संघर्ष करू लागल्या.
(iv) सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढला, राष्ट्रीय चळवळीत व क्रांतिकार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. स्त्रीविषयक सुधारणा चळवळीमुळे स्त्रियांना प्रांतिक मंत्रिमंडळातही स्थान मिळाले.
%20(1).png)
0 Comments