Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

सशस्त्र क्रांतिकारी चळवळ Online Test | इयत्ता आठवी इतिहास व नागरिकशास्त्र | इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा | NMMS EXAM 2024 | Muttepawar Sir

 

 १०.सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

sashastra krantikari chalval swadhyay

Youtube  MCQ Video पाठ , 

स्वाध्याय संपूर्ण उत्तरासह  

Online Test , 

पाहणार आहोत.

सशस्त्र क्रांतिकारी चळवळ  Online Test | इयत्ता आठवी इतिहास व नागरिकशास्त्र | इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा | NMMS EXAM 2024  |  Muttepawar Sir


👉स्वाध्याय  संपूर्ण उत्तरासह 👈

१.दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

(पं.श्यामजी कृष्ण वर्मा , मित्रमेळा, रामसिंह कुका)

१) स्वा.सावरकर यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली.

२) पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले.

३) इंडिया हाउसची स्थापना पं.श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली.


2. पुढील तक्ता पूर्ण करा.

क्रांतिकारक                        संघटना

स्वातंत्र्यवीर सावरकर - अभिनव भारत

बारींद्रकुमार घोष - अनुशीलन समिती

चंद्रशेखर आझाद  - हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी

3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला.

उत्तर : (i) १८९७ साली पुण्यात प्लेगची साथ येऊन त्यात लोकांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढत चालले.

(ii) प्लेगचा बंदोबस्त करण्यासाठी रँड याची प्लेग कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

(iii) पुणे प्लेगपासून मुक्त करण्यासाठी रँडने स्वच्छता मोहीम राबवून लोकांवर जुलूम-जबरदस्ती केली.

(iv) याचा बदला घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला.

(२) खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली.

उत्तर : (i) सशस्त्र मार्गाने ब्रिटिशांची सत्ता उखडून टाकायची या उद्देशाने बंगाल प्रांतात अनुशीलन समिती काम करीत होती.

(ii) या समितीचे सदस्य खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी किंग्ज फोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना तयार केली.

(iii) किंग्जफोर्डची गाडी समजून त्यांनी बॉम्ब टाकला, परंतु ती गाडी किंग्जफोर्डची नव्हती.

(iv) या बॉम्ब हल्ल्यात गाडीत असलेल्या दोन ब्रिटिश स्त्रिया ठार झाल्या.

त्यामुळे पोलिसांच्या हाती लागलेल्या खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली. 

(३) भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले.

उत्तर : i) सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दोन विधेयके मांडली होती.

ii)  ही विधेयके मंजूर झाली, तर लोकांच्या नागरी हक्कांची पायमल्ली होणार होती.

iii) या विधेयकांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बाँब फेकले

४. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

(१) चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचा वृत्तांत लिहा.

उत्तर : (i) आपल्या साथीदारांच्या साहाय्याने सूर्य सेन यांनी चितगाव शस्त्रागारावर हल्ला करण्याची योजना तयार केली.

(ii) १८ एप्रिल १९३० रोजी या क्रांतिकारकांनी चितगाव मधील दोन शस्त्रागारांवर हल्ला करून शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली.

(iii) टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा तोडून टाकल्या.

(iv)  संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात त्यांना यश मिळाले. चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्यानंतर लवकरच या सर्व क्रांतिकारकांना पकडण्यात येऊन फाशी दिले गेली.

२) स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा.

उत्तर : (i) ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी जे विविध मार्ग हाताळले गेले, त्यात सशस्त्र क्रांतीचा मार्गही समाविष्ट होता. हाच मार्ग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वीकारला होता.

(ii) इ.स.१९०० मध्ये त्यांनी 'मित्रमेळा‘ ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली, जिला पुढे 'अभिनव भारत' असे नाव देण्यात आले.

(iii) 'इंडिया हाउस'ची शिष्यवृत्ती मिळवून सावरकर उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने इंग्लंडला गेले.

(iv) तेथून त्यांनी अभिनव भारतच्या सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवले.

(v) भारतीय तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी इटालियन क्रांतिकारक 'जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र' तसेच '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' ही पुस्तके लिहिली.

(vi) सरकारने जॅक्सन वधाचा संबंध सावरकरांशी जोडून त्यांच्यावर खटला भरला.

(vii) न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा देऊन अंदमान येथे ठेवले.  स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान फार मोठे आहे.



NMMS EXAM ची परिपूर्ण तयारी साठी FALLOW बटन किल्क करून ठेवा .

येथे किल्क करा 👇👇👇 


NMMS

ONLINE TEST 👇👇

1/10
जालियनवाला बाग हत्याकांडाला कोण जबाबदार होता ?
कर्झन
साँडर्स
ओडवायर
जॅक्सन
2/10
१९३८ साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ..... अध्यक्ष होते.
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर
दादाभाई नौरोजी
लोकमान्य टिळक
महात्मा गांधी
3/10
वासुदेव बळवंत फडके यांनी शस्त्रविद्येचे शिक्षण कोणाकडून घेतले ?
अण्णा भाऊ साठे
वि. दा. सावरकर
रासबिहारी बोस
वस्ताद लहुजी साळवे
4/10
लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी साँडर्स या अधिकाऱ्याला कोणी गोळ्या घालून ठार केले ?
अनंत लक्ष्मण कान्हेरे
सूर्यसेन
खुदीराम बोस
भगतसिंग व राजगुरू
5/10
चाफेकर बंधूंनी .......रोजी रँडचा वध केला.
२२ जानेवारी १८८३
२२ जून १८९७
२२ जून १९०४
१२ जून १८९७
6/10
गदर या मुखपत्राने भारतीयांना कोणता संदेश दिला ?
बंधुता व राष्ट्रप्रेम
स्वातंत्र्य व सशस्त्र क्रांती
राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती
बंधुता व सशस्त्र क्रांती
7/10
काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापणा यांनी केली
बरकतुल्ला
महेंद्रप्रताप
ओबीदुल्ला सिंधी
वरिल पैकी सर्व
8/10
नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध कोणी केला ?
अनंत लक्ष्मण कान्हेरे
भगतसिंग
सुखदेव
राजगुरू
9/10
अनुशीलन समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र .........येथे होते.
कोलकाता
ढाका
चितगाव
माणिकताळा
10/10
कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ........या युवतीने गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
शांती घोष
सुनीती चौधरी
प्रीतिलता वड्डेदार
बीना दास
Result:

Post a Comment

0 Comments