8. सविनय कायदेभंग चळवळ
Youtube MCQ Video पाठ ,
स्वाध्याय संपूर्ण उत्तरासह
Online Test ,
पाहणार आहोत.
👉स्वाध्याय संपूर्ण उत्तरासह 👈
१.दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
( महात्मा गांधी, खुदा-इ-खिदमतगार, रॅम्से मॅक्डोनाल्ड, सरोजिनी नायडू )
१) लंड्न मध्ये रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते .
२) खान अब्दुल गफारखान यांनी खुदा-इ-खिदमतगार या संघटनेची स्थापना केली.
३) धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी
नायडू यांनी केले .
४) दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे
प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते.
2 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
१) चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने
जबर शिक्षा केली.
उत्तर : i) खान अब्दुल गफारखान
यांच्या खुदा-इ खिदमतगार या संघटनेने पेशावर येथे २३ एप्रिल १९३० रोजी सत्याग्रह सुरू केला.
ii) सत्याग्रहींनी सुमारे आठवडाभर पेशावरवर ताबा ठेवला.
iii) सरकारने सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश गढ़वाल पलटणीला दिला.
iv) गढ़वाल पलटणीचा अधिकारी चंद्रसिंग ठाकूर याने सत्याग्रहींवर गोळीबार करण्यास नकार दिला. त्यामुळे लष्करी न्यायालयाने चंद्रसिंग ठाकूर यांना जबर शिक्षा दिली.
(२) सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला.
उत्तर i ) मिठाच्या
सत्याग्रहानंतर देशभर कायदेभंगाच्या विविध चळवळी सुरू झाल्या.
ii) ६ मे १९३० रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात येऊन कामगारांनी
मोठा मोर्चा काढला.
iii) सोलापूरच्या कलेक्टरने
मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. त्यात शंकर शिवदारे यांच्यासह अनेक सत्याग्रही
मारले गेले.
iv) या घटनेने संतापलेल्या
कामगारांनी रेल्वे स्टेशन, न्यायालये, म्युन्सिपल इमारती यांच्यावर हल्ले केले. त्यामुळे सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी
सोलापुरात मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला.
३) पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा
निष्फळ ठरली.
उत्तर : i) भारतात १९३० च्या
दरम्यान कायदेभंग आंदोलन तीव्र झाले होते.
ii) भारताशी संबंधित घटनात्मक
प्रश्नांचा विचार करण्यासाठी इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी लंडनमध्ये एक गोलमेज परिषद
बोलावली.
iii) या परिषदेला विविध राष्ट्रीय पक्ष आणि
संस्थानिक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही.
iv) राष्ट्रीय सभा ही
संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना असल्याने तिच्या अनुपस्थितीत कोणतेही
निर्णय घेणे सरकारला अशक्य झाले, म्हणून पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ
ठरली.
४) गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले
उत्तर : i) दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली होती.
ii) परिषदेनंतर
प्रधानमंत्री रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी 'जातीय निवाडा' घोषित केला.
iii) त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले.
iv) स्वतंत्र मतदार
संघांच्या या तरतुदीमुळे हिंदू समाजाची विभागणी झाली असती. ही बाब गांधीजींना
अमान्य असल्याने त्यांनी येरवडा तुरुंगात आमरण
उपोषणसुरू केले.
3. पुढील प्रश्नांची
प्रत्येकी २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा
(१) गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले?
उत्तर : i) सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी सरकारकडे मिठावरील कर रद्द
करून मीठ बनवण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करण्याची मागणी केली.
ii) मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक असल्याने अशा जीवनावश्यक वस्तूवर कर लादणे अन्यायकारक होते.
iii) मिठाचा सत्याग्रह प्रतिकात्मक असून सरकारचे जुलमी व अन्यायकारक कायदे
शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा गांधीजींचा मूळ हेतू होता.
iv) सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्या.यामुळे त्यांनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले.
(२) राष्ट्रीय सभेने
सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली ?
उत्तर : i) पहिली गोलमेज परिषद निष्फळ ठरल्यानंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅम्से
मॅक्डोनाल्ड यांनी राष्ट्रीय सभा दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होईल, अशी आशा व्यक्त केली.
ii) चर्चेला अनुकूल वातावरण निर्माण होण्यासाठी गांधीजी आणि अन्य नेत्यांची सरकारने तुरुंगातून सुटका केली.
iii) व्हाइसरॉय आयर्विन आणि गांधीजी यांच्यात चर्चा होऊन करार करण्यात आला.
iv) या करारात भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी सरकारने दिली. त्यामुळे राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली.
४. सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पुर्ण करा.
12 मार्च 1930 - दांडी सत्याग्रहासाठी गांधीजींनी साबरमती आश्रमातून कूच केले.
6 एप्रिल 1930 - दांडी सत्याग्रह. दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.
23 एप्रिल 1930 - पेशावर येथे खुदा-इ-खिदमतगार सघटनेचा सत्याग्रह.
4 मे 1930 - मिठाचा कायदा मोडल्या प्रकरणी गांधीजींना अटक.
6 मे 1930 - सोलापूर येथे हरताळ पाळण्यात आला.
%20(1).png)
0 Comments