6. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS / MTSE परीक्षा या भागात इतिहास नागरिकशास्त्र या विषयातील 6. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या पाठाचे अत्यंत महत्वाचे प्रश्न ,
Online Test ,
Youtube MCQ Video पाठ ,
स्वाध्याय संपूर्ण उत्तरासह पाहणार आहोत.
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून
विधाने पुन्हा लिहा.
(१) भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण
गोखले यांनी केली.
(अ) गणेश वासुदेव जोशी (ब) भाऊ दाजी लाड
(क) म.गो.रानडे (ड) गोपाळ कृष्ण गोखले
(२) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई
येथे भरवण्यात आले.
(अ) पुणे
(ब) मुंबई
(क) कोलकाता
(ड) लखनौ
(३) गीतारहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक
यांनी लिहिला.
(अ) लोकमान्य टिळक (ब) दादाभाई नौरोजी
(क) लाला लजपतराय (ड) बिपीनचंद्र पाल
(ब) नावे लिहा.
(१) मवाळ नेते i) गोपाळ कृष्ण गोखले ii) फिरोजशहा मेहता
(२) जहाल नेते – i) लोकमान्य टिळक ii) लाला लजपतराय
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) स्वातंत्र्यलढ्यात
भारतीयांची अस्मिता जागृत झाली.
i) पाश्चात्त्य
शिक्षणामुळे स्वातंत्र्य, समता, लोकशाही इत्यादी मूल्यांची सुशिक्षित
वर्गाला ओळख झाली.
ii) 'एशियाटिक सोसायटी' च्या स्थापनेमुळे अनेक भारतीयांनी आणि पाश्चिमात्यांनी
भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला.
iii) संस्कृत, फारसी आणि भारतीय भाषांतील
हस्तलिखितांचा त्यांनी अभ्यास केला.
iv) प्राचीन भारतीय
संस्कृतीच्या सखोल अभ्यासानंतर आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे, याची या अभ्यासकांना जाणीव झाली व त्यातूनच स्वातंत्र्यलढ्यात
भारतीयांची अस्मिता जागृत झाली.
२) भारतीय राष्ट्रीय
सभेत दोन गट तयार झाले.
i) राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर पहिल्या दशकात तिचे कार्य संथ गतीने चालू होते.त्यांचा सनदशीर मार्गावर विश्वास होता.
ii) स्वातंत्र्यासाठी
सरकारविरुद्ध संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे, असे काही नेत्यांना वाटू लागले.
iii) राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे आणि चळवळीचा सनदशीर मार्ग याबाबत एकमत असले तरी
कार्यपद्धती - बाबत मात्र मतभेद होऊ लागले.
iv) शांततेचा - सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे ते मवाळवादी आणि तीव्र संघर्षाचा आग्रह धरणारे ते जहालवादी असे दोन गट राष्ट्रीय सभेत निर्माण झाले.
३) लॉर्ड कर्झनने
बंगालची फाळणी करायचे ठरवले.
i) हिंदू आणि मुस्लीम समाजात फूट पाडून स्वातंत्र्य चळवळ दुर्बल करणे हे
इंग्रजांचे मुख्य उद्दिष्ट होते.
ii) लॉर्ड कर्झन याने 'फोडा व राज्य करा' या नीतीचाच वापर करून इंग्रजी
सत्ता बळकट करण्याचे ठरवले.
iii) बंगाल हा मोठा प्रांत असून त्याचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड आहे असे कारण पुढे केले
गेले.
iv) प्रशासकीय सोय हे कारण सांगत १९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगाल प्रांताची फाळणी
केली.
3.टीपा लिहा
(१) राष्ट्रीय सभेची
उद्दिष्टे.
उत्तर : पुढील
उद्दिष्टे साध्य करण्यासाठी १८८५ साली राष्ट्रीय सभेची स्थापना झाली –
i) धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे
भेद विसरून भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांना एका व्यासपीठावर एकत्र आणणे.
ii) या सर्वांमध्ये परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणे.
iii) लोकांमध्ये ऐक्यभावना वाढीस लावणे.
iv) राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे.
(२) वंगभंग चळवळ.
i) लॉर्ड कर्झन याने हिंदू-मुस्लीम यांच्यात फूट पाडण्याच्या उद्देशाने १९०५ साली बंगाल प्रांताची
फाळणी केल्याने सरकारविरोधात भारतभर असंतोष निर्माण होऊन वंगभंग विरोधी चळवळ सुरू झाली.
ii) १६ ऑक्टोबर हा फाळणीचा
दिवस 'राष्ट्रीय शोकदिन' म्हणून पाळण्यात येऊन भारतभर सभा होऊन सरकारचा निषेध
करण्यात आला.
iii) 'वंदे मातरम्' हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
iv) सरकारी शाळा-महाविद्यालये यांच्यावर बहिष्कार टाकला गेला. चतु:सूत्री कार्यक्रमाधारित सुरू झालेली
ही चळवळ राष्ट्रीय चळवळ बनली. अखेरीस १९११ साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली.
(३) राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री.
i) स्वदेशी: आपल्या देशातील भांडवल, साधनसामग्री आणि मनुष्यबळ यांचा उपयोग करून आपले उद्योग वाढवायचे. स्वयंपूर्ण
व स्वावलंबी होऊन देशाचे हित साधायचे, हा स्वदेशीचा अर्थ आहे.
ii) बहिष्कार: परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार टाकणे; ज्यामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घातला
जाईल.
iii) स्वराज्य : देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे
हे अंतिम उद्दिष्ट असेल.
iv) राष्ट्रीय शिक्षण : ज्या शिक्षणातून जनतेत राष्ट्राभिमान निर्माण होईल, असे शिक्षण दयायचे. त्यासाठी भारतीयांनी
राष्ट्रीय शाळांची स्थापना करायची. वंगभंग चळवळी दरम्यान
हा चतु:सूत्री कार्यक्रम भारतभर
राबवला गेला.
४. भारतीय राष्ट्रीय
सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
(१) प्रशासकीय
केंद्रीकरण : ब्रिटिशांच्या एकछत्री अमलामुळे भारतात सर्वत्र समान धोरण लागू होऊन, कायदयासमोर सर्वसमान हे तत्त्व लागू झाले. त्यामुळे भारतीयांत एकात्मतेची जाणीव निर्माण झाली.
(२) आर्थिक शोषण : इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारतीय उद्योगधंदे बंद पडले, शेतकरी हवालदिल झाले. भारताचे मोठ्या
प्रमाणात आर्थिक शोषण झाल्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढू लागला.
(३) पाश्चात्त्य शिक्षण : पाश्चात्त्य शिक्षणातून
भारतीयांना लोकशाही, स्वातंत्र्य, न्याय, मानवता, राष्ट्रवाद असे नवे विचार व नवीन मूल्ये
मिळाल्याने आपणही देशाचा कारभार करू शकतो, ही जाणीव त्यांच्यात
निर्माण झाली.
(४) भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास :
पाश्चिमात्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केल्याने आपल्याला समृद्ध वारसा
लाभल्याची भावना नव सुशिक्षित वर्गात निर्माण झाली.
(५) वृत्तपत्रांचे कार्य : या काळात भारतात
सुरू झालेली इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधील वृत्तपत्रे व नियतकालिके
सरकारच्या अन्यायी धोरणांवर टीका करू लागली. त्यातून सामाजिक आणि राजकीय जागृती
होऊ लागली.
%20(1).png)
1 Comments
Shreyash
ReplyDelete