Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

5.सामाजिक व धार्मिक प्रबोधन | इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता आठवी | NMMS EXAM 2024 | Online Test | Muttepawar Sir

     5.सामाजिक व धार्मिक प्रबोधन  

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS / MTSE परीक्षा या भागात इतिहास नागरिकशास्त्र या विषयातील पाठ 5.सामाजिक व धार्मिक प्रबोधन या पाठाचे अत्यंत महत्वाचे प्रश्न , 

Online Test , 

Youtube  MCQ Video पाठ , 

स्वाध्याय संपूर्ण उत्तरासह  पाहणार आहोत.

5.सामाजिक व धार्मिक प्रबोधन | इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता आठवी | NMMS EXAM 2024  | Online Test | Muttepawar Sir

१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

(सर सय्यद अहमद खान, स्वामी विवेकानंद, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे)

(१) रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली.

(२) मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली.

(३) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली.

२. पुढील तक्ता पूर्ण करा.

उत्तर  :

समाजसुधारकाचे नाव  -  राजा राममोहन रॉय

संस्था                               - ब्रा‌ह्मो समाज

वृत्तपत्र / पुस्तक             -  संवादकौमुदी

संस्थेची कार्ये                   - (१) कर्मकांडास विरोध.

(२) उच्च-नीच असा भेदभाव पाळण्यास विरोध.

(३) सतीप्रथा, बालविवाह व पडदा पद्धती यांना विरोध.

(४) विधवा विवाह व स्त्रियांचे शिक्षण यांना पाठिंबा दिला. 

समाजसुधारकाचे नाव - स्वामी दयानंद सरस्वती

 संस्था                           - आर्य समाज

वृत्तपत्र / पुस्तक        - सत्यार्थ प्रकाश

संस्थेची कार्ये            - (१) जातिभेद पाळायचे नाहीत.

(२) स्त्री-पुरुष समानता.

(३) शिक्षणाच्या प्रसारासाठी शिक्षणसंस्थांची स्थापना.

(४) वैदिक धर्माचा प्रसार केला.

(५) 'वेदांकडे परत चला' हे संस्थेचे ब्रीदवाक्य होते.

समाजसुधारकाचे नाव - महात्मा फुले

संस्था - सत्यशोधक समाज

वृत्तपत्र / पुस्तक - गुलामगिरी

संस्थेची कार्य

(१) समतेच्या आधारावर समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न.

(२) स्पृश्यास्पृश्यतेला विरोध.

(३) बहुजन समाजाच्या शिक्षणाचा व स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार.

(४) अनेक ग्रंथांद्वारे समाज प्रबोधन केले.

(५) स्त्री-पुरुष अथवा माणसा-माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर टीका केली.

(६) बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.

3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा :

(१) भारतात सामाजिक, धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या.

उत्तर : (१) भारतात इंग्रजी शिक्षण सुरू झाले, त्यामुळे नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला.

(२) पाश्चिमात्त्य विचार, संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली.

(३) स्वातंत्र्य, समानता, न्याय, मानवता, लोकशाही इत्यादी मूल्यांवर आधारित समाज निर्माण व्हावा, असे नवसुशिक्षित मध्यमवर्गाला वाटू लागले.

(४) समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, रूढी-परंपरा आदी दोष नष्ट झाले पाहिजेत याची त्यांना जाणीव झाली. या जाणिवेतूनच भारतात १९व्या-२०व्या शतकांत सामाजिक, धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या.

(२) महात्मा फुले यांनी नाभिकांचा संघ घडवून आणला.

उत्तर : (१) समतेच्या तत्त्वावर आधारित समाजनिर्मिती झाली पाहिजे, असा महात्मा फुले यांचा आग्रह होता.

(२) त्यांनी स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री- शिक्षणाचे कार्य केले.

(३) स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या चालीरीती, रूढी, परंपरा यांना त्यांनी कडाडून विरोध केला.

(४) विधवा स्त्रियांचे केशवपन म्हणजे संपूर्ण केस काढून टाकण्याची क्रूर चाल त्या काळात अस्तित्वात होती. या रूढीला विरोध करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला.

4. टिपा लिहा

(१) रामकृष्ण मिशन.

i) हिंदू धर्माची शिकवण देणे आणि समाज प्रबोधन करणे या उद्देशाने रामकृष्ण मिशनची स्थापना झाली

(ii) रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी १८९७ मध्ये या संस्थेची स्थापना केली.

iii) ही संस्था दुष्काळग्रस्तांना मदत करणे, रोगी व दीनदुबळे यांच्यावर औषधोपचार करणे,ही सामाजिक कामे आजही करीत आहे.

iv) स्थापनेपासूनच ही संस्था लोकांची आध्यामिक उन्नती करण्याचे काम करीत आहे.

(२) सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा.

सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या बरोबरीने स्त्रीविषयक सुधारणेचे कार्य केले.

(i) महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य केले.

(ii) समाजातील कर्मठ लोकांच्या टीकेला, निंदा नालस्तीला तोंड देऊन ज्ञानदानाचे कार्य केले.

(iii) म.फुले यांनी घरातच स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या कार्यात सावित्रीबाईंनी साथ दिली.

(iv) स्त्रियांचे प्रबोधन करून त्यांना वाईट रूढींविरुद्ध संघर्ष करण्यास प्रवृत्त केले.


NMMS EXAM ची परिपूर्ण तयारी साठी FALLOW बटन किल्क करून ठेवा .

येथे किल्क करा 👇👇👇 


ONLINE TEST 👇👇


1/10
ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
स्त्री-पुरुष तुलना
सत्यार्थ प्रकाश
गुलामगिरी
संवाद कौमुदी
2/10
इ.स.1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
राजाराम मोहन रॉय
विरेश लिंगम पंतलु
स्वामी विवेकानंद
स्वामी दयानंद सरस्वती
3/10
भारतातील तरूणांना उठा जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, हा संदेश कोणी दिला?
लोकहितवादीनी
डॉ. केशव बळीराम हेगडेवारनी
स्वामी दयानंद सरस्वतींनी
स्वामी विवेकानंदांनी
4/10
गोपाळ हरी देशमुख उर्फ …….यांनी शतपत्रातून स्त्रीपुरुष समानतेचा पुरस्कार केला.
लोकहितवादी
समतावादी
समाजसुधारक
महात्मा
5/10
वेदांकडे परत चला असे कोणाचे ब्रीदवाक्य होते ?
रामकृष्ण मिशनचे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
आर्य समाजाचे
सत्यशोधक समाजाचे
6/10
. विसाव्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ......यांच्या प्रयत्नां मधून उभे राहिले.
ईश्वरचंद विद्यासागर
महर्षी धोंडो केशव कर्वे
विष्णुशास्त्री पंडित
गोपाळ हरी देशमुख
7/10
प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
दादोबा पांडुरंग तर्खडकर
डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर
राजा राममोहन रॉय
महात्मा फुले
8/10
शिखांमधील धर्म सुधारणेसाठी सिंगसभेची स्थापना कोठे झाली ?
मुंबई
दिल्ली
कोलकाता
अमृतसर
9/10
सतीबंदीचा कायदा कोणी अंमलात आणला?
लॉर्ड बेंटिंग
लॉर्ड डलहौसी
लॉर्ड रिपन
लॉर्ड कॉर्नवालीस
10/10
बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी कोणी केली?
पं. ईश्वरचंद विद्यासागर
पं. मदन मोहन मालवीय
वि. दा. सावरकर
डॉ. केशव बळीराम हेडगेवार
Result:

Post a Comment

0 Comments