ब्रिटिश सत्तेचे परिणाम
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षा या भागात इतिहास नागरिकशास्त्र या विषयातील पाठ 3 . ब्रिटिश सत्तेचे परिणाम (british satteche parinam) या पाठाचे अत्यंत महत्वाचे प्रश्न ,
Online Test ,
Youtube MCQ Video पाठ ,
स्वाध्याय संपूर्ण उत्तरासह पाहणार आहोत.
याच पद्धतीने संपूर्ण सामाजिक शास्त्राची तयारी करून घेणार आहोत ते पण सोप्या पद्धतीने .
Online Test 👇👇
स्वाध्याय
१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) पोर्तुगीज, डच , फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले.
(अ) ऑस्ट्रियन
(ब) डच
(क) जर्मन
(ड) स्वीडीश
(अ) ऑस्ट्रियन
(ब) डच
(क) जर्मन
(ड) स्वीडीश
(२) १८०२ मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.
(अ) थोरले बाजीराव
(ब) सवाई माधवराव
(क) पेशवे नानासाहेब
(ड) दुसरा बाजीराव
(अ) थोरले बाजीराव
(ब) सवाई माधवराव
(क) पेशवे नानासाहेब
(ड) दुसरा बाजीराव
(३) जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला.
(अ) मुंबई
(ब) कोलकाता
(क) जमशेदपूर
(ड) दिल्ली
(ब) कोलकाता
(क) जमशेदपूर
(ड) दिल्ली
२. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) मुलकी नोकरशाही.
i) राज्यकर्त्यांना राज्यकारभार करण्यात मदत होण्यासाठी योग्य ते सल्ले देण्यासाठी सरकारी पातळीवर जी यंत्रणा उभी केलेली असते, तिला 'मुलकी नोकरशाही' असे म्हणतात.
ii) भारतात आपली सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांनी मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली.
iii) प्रशासनाच्या सोईसाठी आपल्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी' हा शासनाचा प्रमुख नेमला.
(iv) नोकरशाहीसाठी नियम घालून देण्यात आले. मुलकी नोकरशाही हा इंग्रजांचा भारतातील प्रशासनाचा महत्त्वाचा घटक व प्रमुख आधारस्तंभ बनला.
(२) शेतीचे व्यापारीकरण.
(i) इंग्रज राजवटीपूर्वी शेतकरी आपल्या कुटुंबासाठी आणि गावाची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने अन्नधान्यच पिकवत असत.
(ii) इंग्रजी राजवटीत कापूस, नीळ, तंबाखू, चहा अशा नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी उत्तेजन दिले जाऊ लागले.
(iii) अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नगदी पिके नफा देणारी पिके होती.
(iv) नफा देणाऱ्या या नगदी पिकांना हे जे महत्त्व दिले जाऊ लागले. त्यालाच 'शेतीचे व्यापारीकरण' असे म्हणतात.
(३) इंग्रजाची आ्थिक धोरणे.
(i) औदयोमिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ़ झाली. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली.
(ii) जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली.
(iii) शेतसारा रोख रकमेत आणि वेळेत भरण्याची सक्ती करून स्वतःचा महसूल वाढवला.
(iv) नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर भर दिला. तसेच भारतात आयात होणाऱ्या मालावर कमी कर. तर भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर लादले.
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले.
(i) शेतसारा धान्याच्या रूपात न भरता रोख पैशांच्या स्वरूपात भरण्याचा आणि तो वेळेत न भरल्यास जमीन जप्त करण्याचा नियम सरकारने केला
(ii) रोखीने शेतसारा भरण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावाने धान्य विकू लागले.
(iii) व्यापारी व दलाल शेतकऱ्यांची अडवणूक करून वाजवी पेक्षा कमी दराने माल खरेदी करीत.
(iv) शेतसारा भरण्यासाठी प्रसंगी जमिनी सावकाराकडे गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे.
त्यामुळे इंग्रजांच्या काळात भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले.
(२) भारतातील जुन्या उद्योगधंदयांचा व्हास झाला.
(i) भारतातून इंग्लंडला निर्यात होणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत
असे.
(ii) मात्र, इंग्लंडमधून भारतात आयात होणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारला
जात असे. या व्यापारात इंग्रजांचाच फायदा होत असे.
(iii) इंग्लंडमधून येणारा माल यंत्रांवर तयार होत असल्याने त्याचे उत्पादन मोठ्या
प्रमाणात होत असे.
(iv) यंत्रांवर तयार होणारे हे उत्पादन भारतीय उत्पादनापेक्षा स्वस्त असल्याने त्याची
विक्री अधिक होत असे.
परिणामी या स्पर्धेत भारतीय उद्योगधंदयांचा टिकाव न लागल्यामुळे त्यांचा व्हास झाला.
४. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा.
मुक्तोत्तरी प्रश्न
प्रश्न. इंग्रजांच्या राजवटीचे तुम्हांला जाणवलेले दोन चांगले व दोन वाईट परिणाम कोणते ?
उत्तर : इंग्रजांच्या राजवटीचे मला जाणवलेले दोन चांगले व दोन वाईट परिणाम पुढीलप्रमाणे
१. चांगले परिणाम :
(१) इंग्रजी शिक्षणाने भारताच्या भावी प्रगतीचा पाया घातला गेला.
(२) स्वातंत्र्य, समानता, मानवता ही मूल्ये भारतीय संविधानानेही स्वीकारली.
(३) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार केल्याने भारतात सामाजिक प्रबोधन घडून आले, त्याचा प्रभाव आजही आहे.
२. वाईट परिणाम :
(१) इंग्रजांची 'फोडा व राज्य करा' ही नीती खोलवर रुजली, त्यामुळे आजही धार्मिक, प्रांतिक, भाषिक दुही निर्माण होऊन दंगली उद्भवतात.
(२) आजही आम्ही इंग्रजीचे गुलाम आहोत. आमच्या प्रादेशिक भाषांकडे आम्ही दुर्लक्ष करतो.
अन्य अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न व उत्तर
1. इंग्रजांच्या राजवटीचे भारतावर झालेले अनिष्ट ( वाईट ) परिणाम कोणते ?
उत्तर : इंग्रजांच्या राजवटीचे भारतावर पुढील अनिष्ट परिणाम झाले -
(i) इंग्रजांनी स्वीकारलेल्या आर्थिक धोरणामुळे भारतीयांचे आर्थिक शोषण झाले.
(ii) नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे ग्रामीण जीवनावर अनिष्ट परिणाम झाले.
(iii) शेतसारा रोखीच्या स्वरूपात भरण्यासाठी शेतकऱ्याला जमिनी गहाण ठेवाव्या लागल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला.
(iv) खेड्यांची स्वयंपूर्णता नष्ट झाली.
(v) दुष्काळ निवारणासाठी पुरेसे प्रयत्न न झाल्याने दुष्काळग्रस्तांचे खूप हाल झाले.
(vi) पाणीपुरवठ्याच्या योजनांवर इंग्रजांनी फारसा खर्च न केल्याने शेती नापीक राहिली.
(vii) नगदी पिकांना प्रोत्साहन मिळाल्याने अन्नधान्याचे प्रमाण कमी झाले.
(viii) भारतातील इंग्लंडला निर्यात होणाऱ्या मालावर जबरदस्त कर आकारला जात असल्याने भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडून कारागीर बेकार झाले.
(2) इंग्रज राजवटीचे भारतावर झालेले अनुकूल परिणाम लिहा.
उत्तर : इंग्रज राजवटीचे भारतावर पुढील अनुकूल परिणाम झाले
(i) संपूर्ण भारतात एकच कायदा लागू झाल्याने 'कायद्यापुढे सर्व समान' हे तत्त्व रूढ झाले.
(ii) वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत झालेल्या सुधारणांमुळे देशातील सर्व भागात संपर्क वाढून लोकांत एकतेची भावना वाढीस लागली.
(iii) भारतात कोळसा, धातू, साखर, सिमेंट, रासायनिक द्रव्ये इत्यादी उद्योगांना सुरुवात झाली.
(iv) मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद इत्यादी मूल्यांची भारतीयांना ओळख झाली.
(v) सतीबंदीचा कायदा, विधवा पुनर्विवाहाला मान्यता इत्यादी कायदे समाजसुधारणेस पूरक ठरले.
(vi) पाश्चात्त्य शिक्षणामुळे आधुनिक सुधारणा, नवे विचार, विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख झाली.
(vii) आपला धर्म, इतिहास व परंपरा यांचा अभ्यास करायला हवा, याची जाणीव नवशिक्षित वर्गात निर्माण झाली.
(viii) विद्यापीठांच्या स्थापनेमुळे त्यात शिक्षण घेतलेल्या नवशिक्षित मध्यमवर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले.
(3) तैनाती फौजेच्या अटी कोणत्या होत्या ?
उत्तर : इंग्रजांनी तैनाती फौज स्वीकारणाऱ्या भारतीय सत्ताधीशांवर पुढील अटी घातल्या –
(i) भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे, हे लष्कर त्या सत्ताधीशाचे संरक्षण करेल.
(ii) या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून दयावा.
(iii) इंग्रजांच्या मध्यस्थीनेच इतर सत्ताधीशांशी संबंध ठेवावेत.
(vi) आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजेच प्रतिनिधी ठेवावा.
(4) इंग्रजांची न्यायव्यवस्था व कायदेपद्धती यांत कोणते दोष होते ?
उत्तर : इंग्रजांची न्यायव्यवस्था व कायदेपद्धती यांत पुढील दोष होते
(i) युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र ■ न्यायालये होती.
(ii) भारतीयांसाठी व इंग्रजांसाठी कायदेही वेगवेगळे होते.
(iii) नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत.
(iv) न्यायदानाची ही पद्धती सामान्य लोकांसाठी खूप खर्चीक होती.
(v) खटले वर्षानुवर्षे चालत, त्यामुळे न्यायही लवकर मिळत नसे.
(5) मराठ्यांची सत्ता कशी संपुष्टात आली ?
उत्तर : (i) पेशवेपदाच्या लालसेने रघुनाथरावाने इंग्रजांकडे मदत मागितली, या घटनेने मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला.
(ii) मराठे व इंग्रज यांच्यात १७७४ ते १८१८ या दरम्यान तीन युद्धे झाली.
(iii) मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिल्याने पहिल्या युद्धात मराठ्यांना विजय मिळाला.
(iv) १८०२ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने वसई येथे इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला, यामुळे पेशवे मांडलिक बनले.
(v) वसईचा हा तह काही मराठा सरदारांना अमान्य असल्याने इंग्रज व मराठे यांच्यात दुसरे युद्ध लढले गेले. या युद्धात इंग्रजांचा विजय झाला.
(vi) या विजयामुळे इंग्रजांचा मराठा राज्यकारभारात हस्तक्षेप वाढला.
(vii) हा हस्तक्षेप असह्य झाल्याने दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांशी तिसरे युद्ध केले.
(viii) या तिसऱ्या युद्धात पराभव होऊन बाजीरावाला शरणागती पत्करावी लागली. अशा त-हेने १८१८ मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.
%20(2).png)

0 Comments