प्रकरण 2
स्थान विस्तार Sthan vistar
* स्थान - विस्तार हा पाठ अत्यंत सोप्या भाषेत व सहज पद्धतीने समजून तर घेणार आहोत
* पाठाचा स्वाध्याय भाग 1 भाग 2
* बोर्ड पॅटर्नप्रमाणे घटक चाचणी उत्तरासह व PDF
* Online Test पण पाहणार आहोत.
पाठ 2 स्थान -विस्तार
सर्व प्रथम हा धडा आपणास समजावा यासाठी या धड्याचे अत्यंत सोप्या भाषेत 2 Youtube Video देत आहोत ते पाहून पाठ समजून घ्यावा👇👇
Online Test 👇
स्वाध्याय
प्रश्न १. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा.
(महत्वपूर्ण सूचना : कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार या प्रश्नप्रकारात केवळ 'चूक की बरोबर' हे लिहायचे आहे. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहायची नाहीत, हे खास लक्षात घ्यावे.)
(अ) ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. - बरोबर
(आ) भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे. - चूक
(इ) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. - चूक
(ई) ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. - बरोबर
(उ) ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे. - चूक
(ऊ) भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. - चूक
(ए) भारताच्या दक्षिण भूभागास द्विपकल्प म्हणतात. - बरोबर
प्रश्न २. थोडक्यात उत्तरे लिहा.
अ) स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?
उत्तर : स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले :
(i) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षांत भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले.
(ii) स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतांतील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले.
(iii) स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले.
(iv) स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले.
(आ) भारत व ब्राझील या दोन्ही देशांत स्थाना संदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत ?
उत्तर : भारत व ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत :
(i) भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धांत आहे.
(ii) ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे.
(iii) भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे.
(iv) ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे.
(इ) भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार.
उत्तर : (अ) भारत : (१) अक्षवृत्तीय विस्तार : भारताच्या मुख्यभूमीचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४' उत्तर अक्षवृत्त ते ३७°६' उत्तर अक्षवृत्त आहे. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील ६°४५′ अक्षावरील 'इंदिरा पॉइंट' हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे.
(२) रेखावृत्तीय विस्तार : भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७' पूर्व रेखावृत्त ते ९७°२५′ पूर्व रेखावृत्त आहे.
(ब) ब्राझील : (१) अक्षवृत्तीय विस्तार : ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५°१५' उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५' दक्षिण अक्षवृत्त आहे.
(२) रेखावृत्तीय विस्तार : ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४°४५' पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८' पश्चिम रेखावृत्त आहे.
प्रश्न ३. अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा.
(अ) भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट नावाने ओळखले जाते.
(i) लक्षद्वीप (ii) कन्याकुमारी
(iii) इंदिरा पॉईंट (iv) पोर्ट ब्लेअर
(आ) दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. चिली-इक्वेडोर
(i) चिली-इक्वेडोर
(ii) अर्जेंटिना-बोलिव्हिया
(iii) कोलंबिया-फ्रेंच गियाना
(iv) सुरीनाम-उरुग्वे
(इ) दोन्ही देशांतील राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे.
(i) लष्करी (ii) साम्यवादी
(iii) प्रजासत्ताक (iv) अध्यक्षीय
(ई) खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारीभाग योग्यप्रकारे दर्शवतो?
(ऊ) गोलार्धांचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे?
उत्तर -(iii)ए) गोलार्धांचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे?
बोर्डाच्या दृष्टीने अन्य महत्वपूर्ण प्रश्न
(1) ब्राझील देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सद्यःस्थिती.
उत्तर : (१) ब्राझील देशात सुमारे तीन शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची राजवट होती. या देशास ७ सप्टेंबर १८२२ रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले.
(२) १९३० पासून १९८५ पर्यंत ब्राझील देशात लष्करी राजवट होती. १९८५ पासून या देशाने राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासनप्रणालीचा अवलंब केला आहे.
(३) विसाव्या शतकात ब्राझीलने विविध स्वरूपांच्या जागतिक वित्तीय समस्यांना तोंड दिले आहे व त्यांतून हा देश सावरला आहे.
(४) जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने सदयः स्थितीत ब्राझील देशाकडे पाहिले जाते.
(2) भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आणि सदयः स्थितीचा थोडक्यात आढावा घ्या.
उत्तर :
(१) भारतात सुमारे दीड शतके ब्रिटिशांची राजवट होती.
(२) १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाले.
(३) स्वातंत्र्यप्राप्तीपासून, म्हणजेच १९४७ पासून भारतीय संघराज्याने संसदीय प्रजासत्ताक शासनप्रणालीचा अवलंब केला आहे.
(४) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षांत भारताला तीन युद्धांना व अनेक प्रांतांतील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले.
(५) विविध स्वरूपांच्या समस्या असूनही भारत हा जगातील एक प्रमुख विकसनशील देश आहे.
(६) भारत आज एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातो.
(७) विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासास वेग आला आहे.
(८) भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे (तरुणाईचे) प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे भारताकडे एक 'तरुण देश' म्हणून पाहिले जाते.
एका वाक्यात उत्तरे लिहा :
(१) भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे ?
उत्तर : भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे.
(२) ब्राझीलचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे ?
उत्तर : ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धांत आहे.
(३) ब्राझीलमधून कोणकोणती महत्त्वाची अक्षवृत्ते जातात ?
उत्तर : ब्राझीलमधून विषुववृत्त आणि मकरवृत्त ही महत्त्वाची अक्षवृत्ते जातात.
(४ ) भारतातील सर्वांत दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते ?
उत्तर : भारतातील सर्वांत दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट नावाने ओळखले जाते.
(५) ब्राझीलचा बहुतांश भाग कोणत्या गोलार्धात आहे ?
उत्तर : ब्राझीलचा बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे.
Muttepawar Sir या Youtube channel ला भेट द्यां
%20(1).png)




0 Comments