पाठ 4. सागरतळ रचना स्वाध्याय
sagartal rachna NMMS / MTSE 2024
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) / MTSE EXAM भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता आठवी
भूगोल मधील पाठ 4 . सागरतळ रचना
या पाठाचे महत्वाचे MCQ प्रश्न ,
Online Test ,
Youtube MCQ Video पाठ ,
स्वाध्याय पाहणार आहोत.
याच पद्धतीने संपूर्ण सामाजिक शास्त्राची तयारी करून घेणार आहोत ते पण सोप्या पद्धतीने
👉👉 YOUTUBE MCQ VIDEO 👈👈
ONLINE TEST 👇👇
👉👉 स्वाध्याय 👈👈
प्रश्न १. योग्य पर्याय निवडा.
(अ) जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात कारण ....
(i) पाण्याखाली जमीन आहे.
(ii) पाण्याखाली ज्वालामुखी आहेत.
(iii) जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे.
(iv) जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही.
उत्तर - जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही.
(आ) मानव सागरतळरचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो?
(i) भूखंडमंच
(ii) खंडान्त उतार
(iii) सागरी मैदान
(iv) सागरी डोह
उत्तर - भूखंडमंच
(इ) खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडित आहे?
(i) नद्या, हिमनद्या, प्राणी-वनस्पती अवशेष
(ii) ज्वालामुखीय राख, भूखंडमंच, प्राणी- वनस्पती अवशेष
(iii) ज्वालामुखीय राख, लाव्हारस, मातीचे सूक्ष्मकण
(iv) ज्वालामुखीय राख, सागरी प्राणी-वनस्पतींचे अवशेष, सागरी मैदाने
उत्तर - ज्वालामुखीय राख, लाव्हारस, मातीचे सूक्ष्मकण
उत्तर 👇👇👇👇👇
आ) वरील आराखड्यातील कोणती भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत ?
उत्तर : वरील आराखड्यातील सागरी पठार व सागरी गर्ता ही भूरूपे सागरातील अतिखोलीच्या
संशोधनास उपयुक्त आहेत.
इ) कोणती भूरूपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत ?
उत्तर : भूखंडमंच हे भूरूप सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत.
प्रश्न ३. भौगोलिक कारणे दया.
(१) सागरतळाचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे.
i) सागरतळात मोठ्या प्रमाणात खनिजे,मूलद्रव्ये, खडक, अतिसूक्ष्म मातीचे कण आढळतात.
ii) सागरतळाशी मोठ्या प्रमाणावर प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे अवशेषही आढळतात.
iii) खनिजसंपत्ती, प्राणीसंपत्ती, वनस्पती तसेच ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादींच्या अभ्यासासाठी
सागरतळाचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे.
(२) भूखंडमंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे.
i) भूखंडमंच हा सागरतळाचा उथळ भाग आहे.त्यामुळे भूखंडमंचापर्यंत सूर्यकिरण पोहोचतात.
ii) परिणामी भूखंडमंचावर शेवाळ, प्लवंक यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते.
iii) शेवाळ, प्लवंक हे माशांचे खादय असते. त्यामुळे भूखंडमंचावर मोठ्या प्रमाणात मासे आढळतात.
iv) भूखंडाच्या भागात माशांचे मोठ्या प्रमाणात प्रजनन होते.
अशा प्रकारे, भूखंडमंच मासेमारीसाठी नंदनवन आहे.
३) काही सागरी बेटे ही सागरपर्वतरांगांची शिखरे असतात.
i) सागरतळावर हजारो किमी लांब, शेकडो किमी रुंद व हजारो मीटर उंचीच्या पर्वतरांगा असतात. या पर्वतरांगांना सागरपर्वतरांगा (जलमग्न पर्वतरांगा) म्हणतात.
ii) काही ठिकाणी या सागरपर्वतरांगाची शिखरे समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या वर येतात.अशा ठिकाणी चारही बाजूंना पाणी व मध्यभागी जमीन असे भूरूप तयार होते.अशा भूरूपाला 'सागरी बेट' म्हणतात.
अशा प्रकारे काही सागरी बेटे ही सागरपर्वतरांगांची शिखरे असतात.
४) खंडान्त उतार ही भूखंडांची सीमारेषा मानतात.
i) भूखंडमंचानंतर खंडान्त उतार सुरू होतो.
ii) खंडान्त उताराच्या अधःसीमेनंतर अत्यंत खोल असा सागरी मैदानाचा भाग सुरू होतो.
म्हणून खंडान्त उतार ही भूखंडांची सीमारेषा मानतात.
५) मानवाकडून होणारे टाकाऊ पदार्थाचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते.
i) मानवाकडून होणाऱ्या टाकाऊ पदार्थांच्या विसर्जनामुळे सागरातील पाण्याच्या प्रदूषणाचे
प्रमाण वाढते.
ii) सागरातील पाण्याचे प्रदूषण जलचर व सागरी वनस्पती यांच्या विनाशास कारणीभूत ठरते.
अशा प्रकारे, मानवाकडून होणारे टाकाऊ पदार्थाचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने
हानिकारक असते.
प्रश्न ४. पृष्ठ क्रमांक २७ वरील 'पहा बरे जमते का?' मधील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळरचनेच्या कोणत्या भूरूपाशी संबंधित आहेत ?
उत्तर : मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळाच्या बेट या भूरूपाशी संबंधित आहेत.
(आ) हे भूभाग कोणकोणत्या खंडांजवळ आहेत ?
उत्तर : मादागास्कर भूभाग आफ्रिका खंडाजवळ आणि श्रीलंका भूभाग आशिया खंडाजवळ
आहे.
(इ) आपल्या देशातील कोणती बेटे जलमग्नपर्वत शिखरांचे भाग आहेत ?
उत्तर : आपल्या देशातील अंदमान व निकोबार बेटे जलमग्न पर्वतशिखरांचे भाग आहेत.
%20(2).png)


0 Comments