इतिहासाची साधने
इतिहास राज्य शास्त्र या विषयातील पहिला पाठ इतिहासाची साधने याचे महत्वाचे प्रश्न , Online Test स्वाध्याय पाहणार आहोत..
👉 स्वाध्याय 👈
Online Test 👇👇
स्वाध्याय
१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे
आहे.
(अ) पुणे (ब) नवी दिल्ली
(क) कोलकता (ड) हैदराबाद
(२) दृक्-श्राव्य साधनांमध्ये दूरदर्शन या साधनाचा
समावेश होतो.
(अ) वृत्तपत्र (ब) दूरदर्शन
(क) आकाशवाणी (ड) नियतकालिके
(३) भौतिक साधनांमध्ये म्हणी चा समावेश होत
नाही.
(अ) नाणी (ब) अलंकार
(क) इमारती (ड) म्हणी
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
व्यक्ती विशेष
जाल कूपर - टपाल तिकिट अभ्यासक
कुसुमाग्रज - कवी
अण्णाभाऊ साठे - लोकशाहीर
अमर शेख - चित्रसंग्राहक
प्रश्न 2 टिपा लिहा.
(१) लिखित साधने.
उत्तर : लिखित साधने हे इतिहासलेखनाचे अत्यंत विश्वसनीय असे साधन आहे.
i) लिखित साधनात वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, कोशवाङ्मय असे छापील साहित्य आणि रोजनिशी,पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे इत्यादी लेखन केलेले साधन यांचा समावेश होतो.
ii) या साधनांतून समाजजीवनातील घडामोडी, चळवळी, सांस्कृतिक जीवन, प्रशासकीय धोरणे, सामाजिक प्रथा,
समाजाची प्रगती इत्यादी सर्वांगीण बाबींचा आपल्याला अभ्यास करता येतो.
iii) आधुनिक काळात इंटरनेट हे ही माहिती मिळवण्याचे महत्त्वाचे लिखित साधन उपलब्ध झाले आहे.
(२) प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया
उत्तर :
i) देशभरातील वृत्तपत्रांना जगभरातील बातम्या पुरवण्याचे काम पीटीआय, यूएनआय, समाचार
भारती व हिंदुस्थान समाचार या संस्था करतात.
ii) जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख प्रेस ट्रस्ट
ऑफ इंडियाकडून मिळतात. पीटीआय १९५३ पासून वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक
विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत.
iii) १९९० च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्स ऐवजी 'उपग्रह प्रसारण' तंत्राद्वारे देशभर
बातम्या पाठवायला सुरुवात केली आहे.
iv) पीटीआय ही वृत्तसंस्था सरकारी असून या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातम्या अधिकृत आणि
विश्वसनीय मानल्या जातात. म्हणूनच हा मजकूर इतिहासलेखनासाठी महत्त्वाचा व उपयुक्त
असतो.
प्रश्न 3 कारणे लिहा
(१) टपाल खाते टपाल तिकिटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.
उत्तर : (i) भारत हा वैविध्याने नटलेला देश असून टपाल खात्याने हे वैविध्य आपल्या टपाल तिकिटांच्या माध्यमातून साकारलेले दिसून येते.
(ii) भारत स्वतंत्र झाल्यापासून टपाल तिकिटे बदलत्या काळाविषयीची माहिती आपणास सांगत आली आहेत.
(iii) विविध नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या, ऐतिहासिक घटनांचे रौप्य ते शतकोत्सव, प्राणी, पक्षी, फुले असा निसर्ग, देशातील विविध सण-महोत्सव, महत्त्वपूर्ण संस्थांच्या स्मृती इत्यादींविषयीची तिकिटे टपाल खात्याने काढलेली आहेत.
अशा रितीने टपाल खाते आपल्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा मौल्यवान वारसा आणि एकात्मता यांचे जतन स करण्याचा प्रयत्न करते.
(२) आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक्-श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात.
उत्तर : (i) दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल (इंटरनेट), माहितीपट इत्यादींना 'दृक्-श्राव्य साधने' असे म्हणतात.
(ii) अशा साधनांमुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते.
(iii) राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, महोत्सव, ऐतिहासिक वास्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात.
(iv) वृत्तपट व अनुबोधपट यामुळे इतिहास पुन्हा जिवंत होतो व तो इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतो. म्हणून आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक्-श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात.
अन्य काही महत्वाचे प्रश्न
(१) वृत्तपत्रांचे महत्त्त्व स्पष्ट करा.
उत्तर : (i) उदारीकरणाचा स्वीकार आणि आंतरजालाचा सार्वत्रिक प्रसार होण्याच्या काळातही वृत्तपत्रासारख्या छापील प्रसारमाध्यमाचे महत्त्व कायम आहेच.
(ii) वृत्तपत्रे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आणि राजकारणावर प्रकाश टाकतात.
(iii) कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक घटना अशा मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टींवर चर्चा करतात.
(iv) विविध माहिती व घटनांवर प्रादेशिक पुरवण्या काढतात. वर्षाअखेरीस काही वृत्तपत्रे वर्षभरातील प्रमुख घटनांचा आढावा घेतात. ही सर्व माहिती लिखित पुरावा म्हणून इतिहास अभ्यासकाला उपयुक्त ठरते.
(2) 'इंडियन न्यूज रिव्ह्यू' ही संस्था कोणते कार्य करते ?
उत्तर : (i) 'इंडियन न्यूज रिव्ह्यू' ही संस्था निरनिराळ्या विषयांवर वृत्तपट व अनुबोधपट तयार करते.
(ii) समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती यांचे कार्य समाजापर्यंत जावे या उद्देशाने त्यांच्यावर वृत्तपट बनवले जातात.
(iii) देशातील महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट या संस्थेने तयार केले आहेत. त्यातून पर्यटन वाढीस लागावे हाही उद्देश असतो. असे अनुबोधपट आणि वृत्तपट हे आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी महत्त्वाची दृक्-श्राव्य साधने आहेत.
(३) संग्रहायलये .
उत्तर : वस्तुसंग्रहालये म्हणजे वस्तू, हत्यारे, नाणी, शिल्पे यांचे कलात्मकतेने मांडलेले प्रदर्शनच होय. संग्रहालयात ठेवलेल्या वस्तूं- मुळे अभ्यासकाला त्या काळचा अभ्यास करता येतो. संग्रहालयाचे ऐतिहासिक संग्रहालय, कला वा शस्त्रास्त्र संग्रहालय, प्राणी संग्रहालय असे अनेक प्रकार पडतात. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. प्रत्येक राज्यात आपल्या राज्याची वैशिष्ट्ये सांगणारी संग्रहालये आहेत. काही संग्राहक आपल्या आवडीच्या वस्तूंचा, मूर्ती वा शिल्पांचा संग्रह करीत असतात. इतिहासाच्या अभ्यासाच्या भौतिक साधनात अशी संग्रहालये महत्त्वाची असतात
(4) दृक्-श्रव्य साधनांचा वापर करताना खूप काळजी घ्यावी लागते.
उत्तर : (i) आधुनिक काळाचा इतिहास लिहिताना दृक्-श्राव्य साधनांचा मोठा उपयोग होतो. आंतरजालावर प्रचंड माहिती उपलब्ध असते, तिचा इतिहास लेखनासाठी उपयोग होतो.
(ii) माहितीचा वापर करताना तिची सत्यता तपासून घेणे आवश्यक असते. आंतरजालावर कोणीही कोणतीही माहिती टाकू शकतो.
(iii) म्हणूनच ती माहिती सत्य आहे की नाही, याची काळजी घेऊनच तिचा वापर करायला हवा.
(iv) इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने दृक्-श्राव्य साधनांचा वापर करताना त्यांचे जतन आणि वापर यांची खूप काळजी घ्यावी लागते.
इयत्ता 9 वी ची परिपूर्ण तयारी साठी FALLOW बटन किल्क करून ठेवा .
येथे किल्क करा 👇👇👇
0 Comments