Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

१८५७ चा स्वातंत्र्यलढा स्वाध्याय | इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता आठवी | NMMS EXAM 2024 | Online Test | Muttepawar Sir

१८५७ चा स्वातंत्र्यलढा   

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS / MTSE परीक्षा या भागात इतिहास नागरिकशास्त्र या विषयातील पाठ 4 . १८५७ चा स्वातंत्र्यलढा (1857 cha swatantra ladha) या पाठाचे अत्यंत महत्वाचे प्रश्न , 

Online Test , 

Youtube  MCQ Video पाठ , 

स्वाध्याय संपूर्ण उत्तरासह  पाहणार आहोत.

याच पद्धतीने संपूर्ण सामाजिक शास्त्राची तयारी करून घेणार आहोत ते पण सोप्या पद्धतीने .

१८५७ चा स्वातंत्र्यलढा स्वाध्याय | इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता आठवी | NMMS EXAM 2024  | Online Test | Muttepawar Sir



अत्यंत महत्वपूर्ण MCQ  For NMMS / MTSE👇👇👇👇

 MCQ Video  




NMMS / MTSE Online Test ⇓⇓⇓⇓⇓





१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(उमाजी नाईक, स्वातंत्र्यसमर, लॉर्ड डलहौसी, भारतमंत्री, तात्या टोपे)

(१) स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ च्या लढ्याला स्वातंत्र्यसमर हे नाव दिले.
(२) रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले.
(३) १८५७ च्या लढ्यानंतर भारताविषयी  कारभार करण्यासाठी  भारतमंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले.
(४) भारतातील संस्थाने लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने खालसा केली.
 
 २. पुढीलपैकी विधाने सकारण स्पष्ट करा.
 
(१) इंग्रजांविरुद्ध पाइकांनी सशस्त्र उठाव केला.
i)इंग्रजांनी १८०३ मध्ये ओडिशा जिंकून घेतला.
ii)येथे असणाऱ्या पाइकांच्या वंशपरंपरागत जमिनी इंग्रजांनी काढून घेतल्या.
iii) मिठाच्या किमतीत वाढ केल्यामुळे सामान्य जनते प्रमाणे पाइकांचे जीवनही असह्य झाले.
त्यामुळे संतापलेल्या पाइकांनी १८५७ मध्ये इंग्रजां विरुद्ध सशस्त्र उठाव केला.

(२) हिंदू व मुस्लीम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला
(i) ब्रिटिशांनी १८५६ साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एन्फिल्ड बंदुका दिल्या.
(ii)या बंदुकांतील काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे
(iii) या आवरणाला गाईची व डुकराची चरबी लावलेली असल्याची बातमी हिंदी सैनिकांमध्ये पसरली.
(iv)गाय हिंदूंना पवित्र तर डुक्कर मुस्लिमांना निषिद्ध असल्याने हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या त्यामुळे या सैनिकांत असंतोष निर्माण झाला

३) भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही
(i) भारतीय सैनिकांकडे पुरेशी आणि अद्ययावत शस्त्रास्त्रे नव्हती.
(ii)इंग्रजांकडे असलेली मौठी आर्थिक ताकद आणि अनुभवी सेनानी भारतीय सैनिकांकडे नव्हते.
(iii) भारतीय सैनिकांकडे शौर्य असले; तरी इंग्रजांप्रमाणे योग्य वेळी योग्य डावपेच आखण्यात ते कमी पडले.
(iv) दळणवळणाच्या साधनांवर इंग्रजांचा ताबा असल्याने आपल्या सैनिकांच्या जलद हालचाली करण्यात इंग्रज यशस्वी ठरले.

(४) स्वातंत्र्यलदयानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली.
(i) १८५७ च्या स्वातंत्र्यलदयानंतर ब्रिटिशानी लष्कराची पुनर्रचना केली.
(ii) भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली.
(iii)सर्व जातींचे सैन्य एकत्र आल्यास त्यांच्यात एकीची भावना निर्माण होऊन पुन्हा उठाव होण्याची भीती इंग्रजांना वाटत होती.
(iv) त्यामुळे त्यांनी लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करून पुन्हा उठाव होणार नाही, याची काळजी घेतली

(५) इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले.
(i) आपल्या देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे, हा इंग्रजांचा हेतू होता,त्यासाठी त्यांनी नवी महसूल पद्धती अमलात आणली.
(ii) इंग्लंडमध्ये तयार होणारा माल भारतीय बाजारपेठेत विकून आर्थिक फायदा मिळवण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले.
(iii) त्यामुळे इंग्रजांनी भारतीय उद्योगांवर जाचक कर बसवले.
(iv) या धोरणामुळे भारतीय उद्योग बंद पडून इंग्रजांचा व्यापार भरभराटीस आला.

३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१) १८५७ च्या स्वातंत्र्यलदयामागील सामाजिक कारणे होती
(i) आपल्या परंपरा, चालीरीती, रूढी यात इंग्रज शासक हस्तक्षेप करीत आहेत, अशी भारतीय समाजाची धारणा झाली.
(ii) सामाजिकदृष्टया विघातक अशी सतीची चाल, विधवा विवाहास बंदी अशा प्रथांना इंग्रजांनी कायद्याने बंदी घातली.
(iii) असे कायदे करून परकीय सरकार आपली जीवन पद्धती मोडू पाहत आहे असा लोकांचा समज दृढ होऊ लागला.

(२) १८५७ च्या स्वातंत्र्यलदयाचे परिणाम लिहा.
i) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभारा विरुद्ध जनतेत असलेल्या असंतोषामुळे हा लढा लढला गेला,याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली
ii) भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही याची खात्री होऊन १८५८ च्या कायदयाने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणून ब्रिटिश पार्लमेंटने भारताचा कारभार आपल्या हाती घेतला.
iii) राणी व्हिक्टोरिया हिला एक जाहीरनामा काढून भारतीयांना अनेक आश्वासने दयावी लागली.
iv) इंग्रजांनी भारताच्या लष्कराची पुनर्रचना करून अंतर्गत धोरणात धोरणात्मक बदल केले.

(३) १८५७ च्या स्वातंत्र्यलढयानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले?
(i) भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही.
(ii) भारतीय समाज सामाजिकदृष्ट्या एकसंध होणार नाही, याची काळजी घेणे.
(iii) भारतीय समाजात जात,धर्म,वंश,प्रदेश या कारणांवरून सतत संघर्ष होतील, असे प्रयत्न करणे.
(iv) भारतीय समाज घटकांत एकमेकांविषयी मने कलुषित होण्यासाठी 'फोडा व राज्य करा' हे धोरणसूत्र ठरवले गेले.

(४) १८५७ च्या स्वातंत्र्यलदयानंतर ब्रिटिश पार्लमेंटने भारतातील राज्यकारभारात कोणते बदल केले ?
i) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील राजवट संपुष्टात आणली.
ii) गव्हर्नर जनरल हे पद जाऊन 'व्हाईसरॉय' हे नवीन पद निर्माण करण्यात आले.
iii) भारतातील संपूर्ण राज्यकारभाराचे अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आले. ब्रिटिश पार्लमेंटच्या नियंत्रणाखाली तो भारताचा कारभार पाह लागला.
iv) भारताचा राज्यकारभार करण्यासाठी 'भारतमंत्री' है पद इंग्लंडच्या मंत्रिमंडळात निर्माण करण्यात आले.
 
पुढील परिच्छेद वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : 
 
 
(१) १८५७ च्या लढ्यात कोणाला वीरमरण आले ?
उत्तर : १८५७ च्या लढ्यात राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह व अहमदउल्ला यांना वीरमरण आले.
(२) इंग्रजांनी कोणाला व का फाशी दिले ?
उत्तर : तात्या टोपे यांनी इंग्रजांविरुद्ध दहा महिने लढा दिला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना फाशी दिले
(३) इंग्रजांनी कोणते मार्ग वापरून उठावाचा बीमोड केला ?
उत्तर : इंग्रजांनी उठावकऱ्यांविरुद्ध साम, दाम, दंड आणि भेद या चारही नीतिमार्गांचा वापर करून उठावाचा बीमोड केला.
(४) उठावाचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी कोणी व कोणत्या देशात आश्रय घेतला ?
उत्तर : उठावाचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी नानासाहेब पेशवे व बेगम हजरत महल यांनी भारताशेजारील नेपाळ या देशात आश्रय घेतला.
 
मुक्तोत्तरी प्रश्न

प्रश्न. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातून आपण कोणती शिकवण घेतली पाहिजे, असे तुम्हांला वाटते ?
उत्तर : १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातून आज आपण पुढील शिकवण घेतली पाहिजे, असे मला वाटते.
(i) देशासमोर आलेल्या कोणत्याही समस्येला आपण सर्वांनी एकत्र येऊन तोंड दिले पाहिजे.
(ii) समाजात फूट असेल, एका घटकाला दुसऱ्या घटकाविषयी आपुलकी नसेल; तर त्याचा फायदा तिसरी शक्ती किंवा अन्य राष्ट्र घेऊन देश काबीज करतात, ही गोष्ट समाजातील सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे.
(iii) समाजातील कोणाचेही उदरभरणाचे साधन काढून घेतले की असंतोष निर्माण होतो; म्हणून प्रत्येकाला काम-उद्योग मिळायला हवा.
(iv) सैन्याची व्यवस्था, व्यवसाय, नोकऱ्या, शासन यंत्रणा इत्यादी कोणत्याही ठिकाणी जातवार विभागणी नको. जात, धर्म, वंश इत्यादी बाबतीत सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे.


इतर महत्वाचे प्रश्न 

(1) १८५७ च्या लढ्याच्या अपयशाची कारणे लिहा1

उत्तर : १८५७ चा लढा पुढील कारणांमुळे अपयशी झाला
(i) १८५७ च्या उठावाची व्याप्ती उत्तर भारतापुरती मर्यादित राहिली. संपूर्ण भारतभर आणि एकाच वेळी उठाव झाला नाही.
(ii) इंग्रजांप्रमाणे उठावाला एकसंध असे नेतृत्व मिळाले नाही.
(iii) अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्याने उठावकऱ्यांची ताकद कमी पडली.
(iv) शौर्य असूनही युद्धातील डावपेच आखण्यात उठावकरी कमी पडले.
(v) उठावकऱ्यांकडे पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती.
(vi) इंग्रजांकडे असलेली आर्थिक ताकद, अद्ययावत शस्त्रे आणि अनुभवी सेनानी यांचा उठावकऱ्यांकडे अभाव होता.
(vii) दळणवळणाचा ताबा इंग्रजांकडे असल्याने सैन्याच्या शिस्तबद्ध व जलद हालचाली त्यांना करता आल्या. त्यांच्यापुढे भारतीय सैन्याचा निभाव लागला नाही.
(viii) इंग्रजांची आरमारी ताकद भारतीय संस्थानिकांपेक्षा मोठी होती.

(2) उठावानंतर राणी व्हिक्टोरियाने आपल्या जाहीरनाम्यात भारतीयांना कोणती आश्वासने दिली ?
उत्तर : उठावानंतर प्रसिद्ध केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना पुढील आश्वासने दिली
(i) सर्व भारतीय हे आमचे प्रजाजन असून त्यांच्यात वंश, जात, धर्म, जन्मस्थान यांवरून भेदभाव केला जाणार नाही.
(ii) शासकीय नोकऱ्या देताना त्या फक्त गुणवत्तेच्या आधारेच दिल्या जातील.
(iii) लोकांच्या धार्मिक बाबतीत कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही.
(iv) संस्थानिकांशी केलेले करार पाळले जाऊन त्यांची संस्थाने कोणत्याही कारणासाठी खालसा केली जाणार नाहीत.

(3) हिंदी सैनिकांत असंतोष वाढत गेला.
उत्तर : ब्रिटिशांच्या सैन्यातील हिंदी सैनिकांत असंतोष वाढत गेला; कारण –
(i) इंग्रज अधिकारी हिंदी सैनिकांना तुच्छतेने वागवत.
(ii) त्यांना सैन्यात सुभेदारपदापेक्षा वरचे पद दिले जात नसे.
(iii) कंपनीकडून त्यांना दुजाभावाची वागणूक दिली जात असे.
(iv) गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांना पगार कमी असे; तसेच सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही इंग्रजांनी हळूहळू कमी केले.

स्वाध्याय 
click Here👇👇👇👇👇👇
 

NMMS EXAM ची परिपूर्ण तयारी साठी FALLOW बटन किल्क करून ठेवा .
येथे किल्क करा 👇👇👇 
NMMS

 

Post a Comment

0 Comments