पाठ 1 क्षेत्रभेट
आज आपण क्षेत्रभेट हा पाठ अत्यंत सोप्या भाषेत व सहज पद्धतीने समजून तर घेणार आहोत त्याच बरोबर या
पाठाचा स्वाध्याय
बोर्ड पॅटर्नप्रमाणे घटक चाचणी उत्तरासह व PDF,
Online Test पण पाहणार आहोत.
सर्व प्रथम हा धडा आपणास समजावा यासाठी या धड्याचे अत्यंत सोप्या भाषेत 2 Youtube Video देत आहोत ते पाहून पाठ समजून घ्यावा👇👇👇👇
स्वाध्याय
(अ) तुम्ही केलेल्या क्षेत्र भेटीचा अहवाल तयार करा
उत्तर : विषय : घारापुरी (एलिफंटा) बेटाच्या क्षेत्रभेटीचा अहवाल.
(१) क्षेत्रभेटीचा हेतू :
(i) 'समुद्री बेट' या संकल्पनेचा प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करणे.
(ii) घारापुरी (एलिफंटा) या बेटाविषयी सविस्तर माहिती मिळवणे.
(२) क्षेत्रभेटीद्वारे संकलित केलेली माहिती :
(A) घारापुरी (एलिफंटा) या बेटाचे स्थान
(i) सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला जमिनीचा भूभाग, म्हणजे 'बेट' होय.
(ii) घारापुरी (एलिफंटा) (हे) बेट दक्षिण मुंबईतील ट्रॉम्बेजवळील खाडीतील एक लहानसे बेट आहे.
(iii) घारापुरी (एलिफंटा) या बेटाचे स्थान रायगड जिल्ह्यात आहे.
(B) घारापुरी (एलिफंटा) या बेटाचे क्षेत्रफळ
(I) समुद्राच्या भरतीच्या वेळी घारापुरी (एलिफंटा) या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे
१० चौरस किमी असते.
(II) समुद्राच्या ओहोटीच्या वेळी घारापुरी (एलिफंटा) या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे १६ चौरस किमी असते.
(C) घारापुरी (एलिफंटा) या बेटावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची साधने : (I) घारापुरी (एलिफंटा) या बेटावर पोहोचण्यासाठी प्रामुख्याने मुंबईतील 'गेटवे ऑफ इंडिया 'पासून प्रवासी बोटीने जावे लागते.
(II) मुंबईतील 'गेटवे ऑफ इंडिया 'पासून घारापुरी (एलिफंटा) या बेटावर पोहोचण्यासाठी सुमारे एक तासाचा कालावधी लागतो.
(III) या प्रवासादरम्यान मुंबईतील टोलेजंग इमारती, मोठमोठ्या व्यापारी नौका, सी-गल पक्ष्यांचे थवे दिसतात.
(D) घारापुरी (एलिफंटा) या बेटावरील पर्यटकांची आकर्षणे :
(I) घारापुरी (एलिफंटा) या बेटावर पाषाणात खोदलेली अनेक ऐतिहासिक लेणी आढळतात.
(II) ही लेणी जगप्रसिद्ध आहेत. येथे दरवर्षी अनेक भारतीय व परदेशी पर्यटक भेट देतात.
(E) घारापुरी (एलिफंटा) या बेटावरील लोकजीवन :
(I) घारापुरी (एलिफंटा) या बेटावर सुमारे १५०० ते २००० लोकांची वस्ती आढळते.
(II) घारापुरी (एलिफंटा) या बेटावरील लोक मुख्यतः पर्यटन, भातशेती, बोटींची दुरुस्ती व मासेमारी या व्यवसायांत गुंतलेले आढळतात.
(F) घारापुरी (एलिफंटा) या बेटावरील समस्या :
(I) घारापुरी (एलिफंटा) या बेटावरील स्थानिकांना व पर्यटकांना काही प्रसंगी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या समस्येस सामोरे जावे लागते.
(II) घारापुरी (एलिफंटा) या बेटावर पुरेशा प्रमाणात शैक्षणिक व वैदयकीय सेवा उपलब्ध नाहीत.
(ब) कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
(i) या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
(ii) कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती?
(iii) कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते ?
iv) कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या
ठिकाणाहून आणला जातो?
(v) कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो?
(vi) कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते?
(vii) पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात?
(viii) कारखान्यातील कामगारांचा विशिष्ट पोशाख आहे का?
(ix) कारखान्याची संदेशवहनाची साधने कोणती आहेत?
(x) कारखान्यातील कचऱ्याची व्यवस्था कशी केली जाते ?
(xi) कारखान्यात सांडपाण्याची व्यवस्था आहे का ?
इ) क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल?
I) क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्या बरोबर नेऊ.
II) क्षेत्रभेटीदरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. त्यासाठी क्षेत्रभेटीदरम्यानवापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टने,उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू.
iii) संबंधित क्षेत्रात माहिती फलक, पथनाट्ये, सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव- जागृती वाढवू.
iv) संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे/मुलाखतीद्वारे संपर्क साधू.
Muttepawar Sir.
ई) क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल ?
(१) माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन,पेन्सिल,कॅमेरा, मोजपट्टी, दुर्बीण इत्यादी.
(२) स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व नकाशे.
(३) नमुना प्रश्नावली.
(४) क्षेत्रातील पाण्याचे,मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे. याशिवाय, टोपी,
पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी.
(१) क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.
(२) क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यांतील सहसंबंध जाणून घेता येतो.
(३) क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक,ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो.
(४) क्षेत्रभेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते.
%20(1).png)
.png)
1 Comments
खूप छान
ReplyDelete