HSC Result 2025 Maharashtra Board
05 मे रोजी दुपारी 01 : 00 वाजता निकाल जाहीर केला जाणार
बारावीचा निकाल उद्या म्हणजेच 5 मे 2025 रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) प्रत्येक वर्षी बारावीचा निकाल ऑनलाईन माध्यमातून जाहीर केला जाईल.
* सर्वात आधी खाली दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवरती क्लिक करा.
* तुमचा Roll Number टाका.
* त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.
* View Result या बटणावर क्लिक करा.
* तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.
* खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.
खालील लिंकला किल्क करून आपला निकाल पहा 👇
१. https://results.digilocker.gov.in
२. https://mahahsscboard.in
३. http://hscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
६ . https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-
results
८. https://www.indiatoday.in/education-today/results
९. https://www.aajtak.in/education/board-exam-results
तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-
१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी मंगळवार, दिनांक ०६/०५/२०२५ ते मंगळवार, दिनांक २०/०५/२०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/UPI/Net Banking याद्वारे भरता येईल.

0 Comments