Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

इयत्ता आठवी , भूगोल १. स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय | भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता आठवी | sthanik vel v praman vel | Online Test

 इयत्ता आठवी , भूगोल १. स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय | sthanik vel v praman vel 

NMMS EXAM 

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षा  या भागात  भूगोल  या विषयातील  इयत्ता आठवी , भूगोल १. स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय | sthanik vel v praman vel या पाठाचे  महत्वाचे प्रश्न , Online Test , Youtube  MCQ Video पाठ , स्वाध्याय पाहणार आहोत.

याच पद्धतीने संपूर्ण सामाजिक शास्त्राची तयारी करून घेणार आहोत ते पण सोप्या पद्धतीने 

.

इयत्ता आठवी , भूगोल १. स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय | sthanik vel v praman vel | Online Test

 👉👉 YouTube MCQ Video  👈👈


बहूपर्यायी Online Test 👇👇


स्वाध्याय 

प्रश्न १. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.

(अ) पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
(i) ०५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
(ii) १० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
(iii) १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
(iv) २० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

(आ) पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी... दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. 
(i) दोन्ही ठिकाणची मध्यान्हाची वेळ माहीत असावी लागते.
(ii) दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. 
(iii) दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो.
(iv) आंतरराष्ट्रीय वाररेषेनुसार बदल करावे लागतात.

(इ) कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत ०४ मिनिटांचा फरक असतो.
(i) १५ मिनिटांचा फरक असतो.
(ii) ०४ मिनिटांचा फरक असतो.
(iii) ३० मिनिटांचा फरक असतो.
(iv) ६० मिनिटांचा फरक असतो.

प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा.

(१) स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते.
उत्तर : 
i) सर्वसाधारणपणे मध्यान्ही सूर्य जास्तीत जास्त उंची गाठतो व त्या वेळी दिनमानातील निम्मा वेळ पूर्ण झाला असे गृहीत धरले जाते.
ii) एखादे रेखावृत्त जेव्हा बरोबर सूर्यासमोर येते त्या त्या वेळी रेखावृत्तावर मध्यान्ह झाल्याचे (दुपारचे बारा वाजले असल्याचे) गृहीत धरले जाते.
iii) मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर (उत्तर ध्रुववृत्ता-पासून ते दक्षिण ध्रुववृत्तापर्यंत सर्व ठिकाणी) सर्वत्र सारखी असते. म्हणून, स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते.

(२) ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाणवेळ मानली जाते.
उत्तर :
i) जागतिक प्रमाणवेळ ही 0° रेखावृत्ताच्या संदर्भात ठरवली आहे.
ii) इंग्लंडमधील ग्रीनीच शहराजवळून 0° रेखावृत्त जाते. जगातील विविध देशांतील व्यवहारांत सुसूत्रता आणण्यासाठी ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाणवेळ मानली जाते.

(३) भारताची प्रमाणवेळ ८२° ३०' पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे.
उत्तर :
i) ८२° ३०' पूर्व हे रेखावृत्त भारताच्या (रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भात) मध्यवर्ती भागातून जाते.
ii) या रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत व देशातील इतर कोणत्याही पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळांत एक तासाहून अधिक कालावधीचा फरक पडत नाही. त्यामुळे, भारताची प्रमाणवेळ ८२°३० पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे.

(४) कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत.
उत्तर :
i) कॅनडा देशाचा रेखावृत्तीय विस्तार ५२०३७' पश्चिम रेखावृत्त ते १४१० पश्चिम रेखावृत्त इतका आहे.
ii) म्हणजेच,कॅनडा देशाच्या अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील रेखावृत्तांमधील अंशात्मक फरक हा सुमारे ८८ अंशांचा आहे.
iii) कॅनडाच्या अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळांत सुमारे ३५२ मिनिटांचा म्हणजेच, ५ तास ५२ मिनिटांचा फरक पडतो. त्यामुळे कॅनडात केवळ एकच प्रमाणवेळ मानणे गैरसोयीचे ठरते. म्हणून दैनंदिन व्यवहारांत सुसूत्रता आणण्ण्यासाठी कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत.

 प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा.
1) ६० पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील, तर ३०° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील
i) ६०° पूर्व रेखावृत्त व ३०° पश्चिम रेखावृत्त या दोन रेखावृत्तांतील अंशात्मक फरक = ९०° (० रेखावृत्त ते ६०° पूर्व रेखावृत्त या दोन रेखावृत्तांतील ६० अंशांचा फरक + 0° रेखावत्त ते ३०० पश्चिम रेखावृत्त या दोन रेखावृत्तांतील ३०अंशांचा फरक = ९० अंशांचा फरक.)
(ii) या दोन रेखावृत्तांतील एकूण वेळेतील फरक : = ९० x ४
= ३६० मिनिटे
= ३६० मिनिटे : ६० मिनिटे
= ६ तास
iii) पूर्वेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळ ही पश्चिमेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळेच्या पुढे
आणि पश्चिमेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळ ही पूर्वेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळेच्या मागे असते.
(iv) म्हणजेच, ६०° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील, तर ०° पश्चिम रेखावृत्तावर
सकाळचे ६ (६ तासांनी मागे) वाजले असतील.

(2) एखादया प्रदेशाची प्रमाणवेळ कशी निश्चित केली जाते
उत्तर : एखादया प्रदेशाची प्रमाणवेळ पुढीलप्रमाणे निश्चित केली जाते. :
i) रेखावृत्तीय विस्तार अधिक असणाऱ्या देशातील / प्रदेशातील विविध भागांतील दैनंदिन व्यवहारांत सुसूत्रता आणण्यासाठी देशाच्या (रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भात) मध्यवर्ती भागातून जाणान्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही त्या देशाची/प्रदेशाची प्रमाणवेळ मानली जाते.
ii) एखादया देशातील/प्रदेशातील अतिपूर्वेकडील रेखावृत्ताच्या आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळांत सुमारे दोन तासांचा किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचा फरक असेल, तर अशा देशात /
प्रदेशात सर्वसाधारणपणे केवळ एक प्रमाणवेळ मानली जाते.
iii) एखादया देशातील/प्रदेशातील अतिपूर्वेकडील रेखावृत्ताच्या आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळांत सुमारे दोन तासांहून अधिक कालावधीचा फरक असेल, तर अशा देशात/प्रदेशात एकापेक्षा अधिक प्रमाणवेळांचा वापर केला जातो.

(3) ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू झाला. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा.
i) विधान : कोणत्याही रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ ४ मिनिटांनी कमी होते. (सावो पावलो हे ठिकाण भारताच्या पश्चिमेकडील रेखावृत्तावर आहे.)
ii) सावो पावलो व भारत या ठिकाणांच्या रेखावत्तांतील अंशात्मक फरक= १२७° ३०'.
(iii) एकूण वेळेतील फरक = १२७.५x४
= ५१० मिनिटे
= ५१० मिनिटे - ६० मिनिटे
= ८ तास ३० मिनिटे.
iv) म्हणजेच, भारतात सकाळचे सहा वाजले असतील तेव्हा सावो पावलो येथे आदल्या दिवसाच्या रात्रीचे ९ वाजून ३० मिनिटे (८ तास ३० मिनिटांनी मागे) वाजले असतील. म्हणजेच, ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू झाला असता,तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ आदल्या दिवसाच्या रात्रीचे ९ वाजून ३० मिनिटे इतकी असेल. 

प्रश्न ४. मूळ रेखावृत्तावर २१ जून रोजी रात्रीचे १० वाजले तेव्हा अ,ब, क या ठिकाणची वेळ व दिनांक कोष्टकात लिहा.



प्रश्न ५. खालीलपैकी वेगवेगळ्या स्थिती 'क' या ठिकाणी कोणकोणत्या आकृतींत दिसून येतात ते आकृतींखालील चौकटींत लिहा.



 👉👉स्वाध्याय  👈👈 


NMMS EXAM ची परिपूर्ण तयारी साठी FALLOW बटन किल्क करून ठेवा .
येथे किल्क करा 👇👇👇 

NMMS

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (इयत्ता ८ वी) 2024

Post a Comment

4 Comments