SSC SUPPLIMENTERY EXAM JULY 2024 | वर्ग दहावी पुरवणी परीक्षा व श्रेणी सुधार परीक्षा जुलै 2024 | Muttepawar sir
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे - ४
जुलै २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांबाबत प्रकटन
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) मार्च २०२४ परीक्षेचा निकाल दिनांक २७/०५/२०२४ रोजी ऑनलाईन जाहीर झालेला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-२०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी)ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने इयत्ता १०वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत -
माध्यमिक शाळांमार्फत पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ट न झालेले), श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे, ITI विषय घेऊन प्रविष्ट होणान्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा
नियमित शुल्क
शुक्रवार दिनांक ३१/०५/२०२४ ते मंगळवार, दिनांक ११/ ०६ /२०२४
विलंब शुल्क
बुधवार, दिनांक १२/·०६ / २०२४ ते सोमवार, दिनांक १७/०६ / २०२४
माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा
शनिवार,दि. ०१/०६ /२०२४ ते बुधवार, दि. १९/०६ /२०२४
माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख
शुक्रवार, दि.२१ /०६ / २०२४
सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये होणान्या परीक्षेची आवेदपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फतच भरावीत. सर्व माध्यमिक शाळांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील बाबी विचारात घेणे आवश्यक आहेत -
1. ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना मार्च २०२४ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल.
2. श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या मार्च २०२४ परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै २०२४ व मार्च २०२५ अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी.
3. नियमित, विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारेच भरण्यात यावे.
4. सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.
5. आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.

0 Comments